आॅनलाईन लोकमततिवसा : तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर असलेल्या व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या शिरजगाव मोझरीत युवक काँग्रेसने शुक्रवारी आंदोलन केले. दत्तक गावाचा विकास झाला की नाही हे एकदा तरी मुख्यमंत्र्यांनी येऊन पाहावे, असे आव्हान काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी दिले.तालुक्यातील मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या चार गावांपैकी शिरजगाव मोझरी येथील वास्तव ‘लोकमत’ने लोकदरबारात मांडले होते. येथे नेमण्यात आलेले मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी केवळ कागदी घोडे नाचवत असल्याचे प्रसिद्ध होताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गावात जाऊन वास्तव जाणून घेतले, तर शुक्रवारी युवक काँग्रेसने आंदोलन केले. प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पुनसे, रामटेके यांनी आंदोलन स्थळी भेटी दिली व आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.आंदोलनामध्ये तालुका काँग्रेस अध्यक्ष मुकुंद देशमुख, दिलीप काळबांडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य वैभव वानखडे, पं.स. उपसभापती लुकेश केने, सदस्य मंगेश भगोले, रंजना पोजगे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष रीतेश पांडव, कामगार सेल अध्यक्ष पंकज देशमुख, सतीश पोजगे, बाजार समिती संचालक योगेश वानखडे, नगरसेवक नरेंद्र विघ्ने, सचिन गोरे, यु.काँ.अध्यक्ष सागर राऊत, प्रद्युम पाटील, निशिकांत राऊत, उपसरपंच पवन काळमेघ, उमेश राऊत, गंगाराम अडसोड, अनिल मेश्राम, देवेंद्र घाटोळ, निरंजन कडू, विनोद गणेशे, आशिष ताथोडे, वैभव काकडे सहभागी झाले.तिवस्यातील चार गावे घेतली दत्तकतिवसा तालुक्यातील चार गावे मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतली आहेत. यात शिरजगाव मोझरी, शेंदोळा खुर्द, शेंदोळा बु, जावरा (फत्तेपूर) या गावांचा समावेश आहे. या गावांतील नागरिक व गावकरी युवक मंडळी विकास कामे होतील, शासकीय योजना मिळतील, या आशेने आतुरतेने वाट पाहत आहे. पण, त्यांच्या पदरी निराशाच आली आहे. शिरजगाव मोझरीमध्ये दारूबंदी असताना जि.प. पूर्वमाध्यमिक शाळेतील भिंतीवर, शाळा परिसरत दारूच्या बाटलांचा खच पडला असल्याचे चित्र आहे.गावकरी झाले सहभागीमुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात स्थानिकांच्या मागण्यांचा समावेश केलेल्या पत्राच्या प्रतीकात्मक फलकासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या दिला. ‘गाव पोरके करू नका’ अशी अपेक्षा गावकºयांनी केली व काँग्रेसच्या आंदोलनास पाठिंबा दिला.मुख्यमंत्री पृथ्वीराज यांना गावाची आठवण म्हणून आज हे प्र’१कात्मक आंदोलन करण्यात आले. ‘मुख्यमंत्री दत्तक गावा’चा विकास खुंटला आहे, हा मुद्दा आमदार यशोमती ठाकूर नागपूर अधिवेशनात लावून धरणार आहेत.- वैभव वानखडे,युवक काँग्रेस नेते
साहेब, एकदा शिरजगावला भेट द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 12:07 AM
तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर असलेल्या व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या शिरजगाव मोझरीत युवक काँग्रेसने शुक्रवारी आंदोलन केले.
ठळक मुद्देयुवक काँग्रेस आक्रमक : मुख्यमंत्री दत्तक गावात लक्षवेधी ठिय्या आंदोलन