शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

Amravati: साहब, वहाँ लडकियां नही मिलती ब्याहनेंको! राजस्थानच्या तिघांची कबुली: मानवी तस्करीतील पाचवा अटकेत

By प्रदीप भाकरे | Published: March 22, 2023 8:13 PM

Amravati: साहब, हम गरीब तबकेके लोग, हम क्या तस्करी करेंगे, हमारे इधर लडकियां नही मिलती ब्याहनेंको, तो बच्चे को वैसा रखना क्या, इसलिये गहने बेचके फरीद अलीको १ लाख ३० हजार रुपये दिए. लडकी घरमें लायी. शादी की, ही कबुली आहे, राजस्थानातून पकडून आणलेल्या तिघांची.

- प्रदीप भाकरे अमरावती: साहब, हम गरीब तबकेके लोग, हम क्या तस्करी करेंगे, हमारे इधर लडकियां नही मिलती ब्याहनेंको, तो बच्चे को वैसा रखना क्या, इसलिये गहने बेचके फरीद अलीको १ लाख ३० हजार रुपये दिए. लडकी घरमें लायी. शादी की, ही कबुली आहे, राजस्थानातून पकडून आणलेल्या तिघांची. हमारा दोष नही, अलीनेही हमको फंसाया, अशी कबुली देखील त्या तिघांनी दिली आहे. त्या तिघांसह उज्जैनच्या दलाल फरीद अलीची रवानगी देखील कारागृहात करण्यात आली आहे.

स्थानिक न्यायालयाने मंगळवारी चौघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे ते आधीच्या संतोष इंगळे, मुकेश राठोड व एका महिलेप्रमाणे जिल्हा कारागृहात बंदिस्त झाले आहेत. येथील एका अल्पवयीन मुलीची परप्रांतात विक्री केल्याप्रकरणीच्या गुन्ह्यात गुन्हे शाखेने मध्य प्रदेशातून एकाला तर राजस्थानातून तिघांना जेरबंद केले होते. त्यात फरीद अली एहसान अली, चंपादास बालुदास वैैष्णव, सुरेशदास जमनादास वैष्णव व संजय पुरुषोत्तमदास वैष्णव यांचा समावेश आहे. दरम्यान,  येथे जेव्हा त्या अल्पवयीन मुलीच्या विक्रीचा व्यवहार ठरला, त्यानंतर पंधरा दिवसांनी ती १८ वर्षांची होणार असल्याचे फरीद अलीने वैष्णव कुटुंबाला सांगितले होते. मात्र, आपल्या समक्ष मुलाचा विवाह व्हावा, अशी संजय वैष्णवच्या आजारी आईची इच्छा असल्याने ती १८ ची होण्यापूर्वीच तिच्याशी लग्न करण्यात आल्याची कबुली देखील आरोपींनी दिली आहे.काय निघाले तपासातआरोपींच्या कथनानुसार, राजस्थानात मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी असल्यामुळे तिथे विवाह संस्थेमध्ये अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. त्यावर मात करण्यासाठी प्रसंगी पदरमोड करून मुलींना विवाहासाठी विकत घेतले जाते. याही प्रकरणात अकोल्याच्या पाच आरोपींनी  अल्पवयीन मुलीला मध्य प्रदेशात व्यवहार करून तिचे लग्न लावून देण्यात आले. दरम्यान, याप्रकरणातील प्रवीण राठोड व एक महिला अद्याप पसार आहे. तर प्रकरणात नाव आलेला आकाश वेरूळकर मिसिंग आहे.

जामीन घेण्यासाठी आला अन् अडकलाआपल्या भावाला अमरावती पोलिस पकडून घेऊन गेल्याची माहिती मिळताच छोटा मंगळवारी अमरावतीत आला. पोलिसांना जामिनासाठी भेटला. अधिक शहानिशा केली असता, मानवी तस्करीच्या प्रकरणात तो देखील सहभागी असल्याची पूरक माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे चौकशीअंती त्याला देखील अटक करण्यात आली. राहुल पुरुषोत्तमदास वैष्णव असे अटक आरोपीचे नाव आहे. त्यालाही एमसीआर सुनावण्यात आला आहे. त्यामुळे याप्रकरणात अटक आरोपींची संख्या आता आठवर पोहोचली आहे.

टॅग्स :ArrestअटकAmravatiअमरावती