लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळ चव्हाळा : मागील ३ वर्षापेक्षा यंदा पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने जेथे तेथे पाणी साचले आहे आणि पन्नास-साठ वर्षापूर्वीच्या इमारती या पूर्णपणे शिकस्त झालेल्या आहे. अशा इमारतींच्या नुतनीकरणासोबत देखभाल दुरूस्तीची कामे करणे आवश्यक आहे.नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील सहा इमारती पूर्णपणे शिकस्त झाल्या आहेत. त्या कधी कोसळणार, याची शाश्वती नाही. गावातील भारतीय स्टेट बँक, जिल्हा परिषदेचे व्यापारी संकूल, जुनी ग्रामपंचायत, टेलिफोन आॅफिस, सहकारी सोसायटीचे जुने गोडाऊन, जिल्हा परिषदेची जुनी शाळा अश्या सहा इमारती जिर्ण अवस्थेत आहेत. भारतीय स्टेट बँकेच्या इमारतीचे छताचे प्लास्टर सुट्टीच्या दिवशी दुपारी कोसळले. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. हीच घटना कार्यालयीन वेळेत झाली असल्यास अनुचित घटना घडली असती. विशेष म्हणजे या भारतीय स्टेट बँक शाखेचे कर्मचारी सुट्टीच्या दिवशीही काम करतात.मंगरूळ चव्हाळा येथील एसबीआयच्या कार्यक्षेत्रात २३ च्यावर गावे आहेत. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना नेहमीच उशिरापर्यंत कामे पुरतात. मात्र, छताचे प्लास्टर कोसळल्याने कर्मचारी देखिल जीव मुठीत घेऊन काम करीत आहेत व बँकेत कामानिमित्य येणाºया २३ च्यावर गावामधील नागरिकांमध्ये देखिल भीतीचे वातावरण आहे.गावचे सरपंचांनी बँकेकरिता नवीन इमारत घ्यावी, अशी मागणी केली आहे. गावातील शिकस्त अवस्थेतील या सहा इमारती पाडून नवीन इमारती बनवाव्या अन्यथा कुठलीही दुर्घटना झाल्यास याला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.मागील महिन्यात इमारतीचे छताचे प्लास्टर सुट्टीच्या दिवशी कोसळले. कुठलीही जीवितहानी झाली नाही. अद्याप या इमारतीची आवश्यक दुरूस्ती करण्यात आलेली नाही.- नितीन बेसनाबँक व्यवस्थापक, मंगरूळ चव्हाळा.गावातील इमारती जुन्या असल्याने संबंधित विभागाने या इमारतीची दुरुस्ती करावी किंवा नवीन इमारत द्यावी.- गजानन काकडेग्रामस्थ मंगरूळ चव्हाळा
मंगरूळ चव्हाळातील सहा इमारती जीर्ण अवस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 10:12 PM
मागील ३ वर्षापेक्षा यंदा पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने जेथे तेथे पाणी साचले आहे आणि पन्नास-साठ वर्षापूर्वीच्या इमारती या पूर्णपणे शिकस्त झालेल्या आहे. अशा इमारतींच्या नुतनीकरणासोबत देखभाल दुरूस्तीची कामे करणे आवश्यक आहे.
ठळक मुद्देस्टेट बँकेचे प्लॅस्टर कोसळले : जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण?