लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील नव्या भागांमध्ये आता कोरोनाचा शिरकाव होत आहे. शनिवारी प्राप्त अहवालानुसार सहा व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा एका संक्रमित वृद्ध महिलेचे निधन झाले, तर अकोला येथील एकाचा अहवाल अमरावतीमध्ये पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या १५१ वर पोहोचली आहे.विद्यापीठाचे विषाणू परीक्षण प्रयोगशाळेच्या प्राप्त अहवालानुसार मसानगंज येथे ७५ वर्षीय वृद्ध, याच परिसरालगत असलेला बजरंगटेकडी परिसरात १८ वर्षीय युवक, बिलालनगरात ५२ वर्षीय व्यक्ती, खूर्शीदपुरा येथे ४२ वर्षीय व्यक्ती व येथील कोविड रुग्णालयात कॅम्युनिटी हेल्थ ऑफिसर या कर्तव्यावर असलेले अकोला येथील अनंतनगरातील २८ वर्षीय व्यक्तींचा थ्रोट स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. कोविड रुग्णालयात १० दिवस सेवा दिल्यानंतर त्यांची स्वॅब तपासणी करण्यात आली असता, अहवाल पॉझिटिव्ह आला. येथील कोविड रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी दाखल अलहिलाल कॉलनीतील ५६ वर्षीय महिलेचा शुक्रवारी रात्री उशिरा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १५ वर पोहोचली आहे. येथील जुना कॉटन मार्केट भागात पॉझिटिव्ह आलेल्या एका राजकीय नेत्यावर नागपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना शनिवारी कोरोनामुक्त करण्यात आले.
अमरावतीमध्ये आणखी सहा पॉझिटिव्ह; कोरोनाग्रस्तांची संख्या १५१
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 7:50 PM
अमरावती येथील नव्या भागांमध्ये आता कोरोनाचा शिरकाव होत आहे. शनिवारी प्राप्त अहवालानुसार सहा व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
ठळक मुद्देअकोल्याचे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर अमरावतीत संक्रमित