फोटो पी १९ धारणी
पंकज लायदे
धारणी : तालुक्यातील गडगा मध्यम प्रकल्प बांधकामाला मोठ्या प्रमाणात रेती लागत असल्याने तेथील कंत्राटदाराने मध्यप्रदेशातील हरदा येथून रेती वाहतूक सुरू केली होती. टिप्परमधून होणारी ती वाहतूक विनापरवाना असल्याने तहसीलदार अतुल पाटोळे यांनी ते सहाही टिप्पर तहसील कार्यालयात जमा केले. बुधवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, त्या सहा टिप्परवर शुक्रवारी २४ लाख ४२ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
धारणी तालुक्यात गडगा मध्यम प्रकल्पाचे काम एक वर्षांपासून सुरू करण्यात आले आहे. त्या बांधकामाला हजारो ब्रास रेती लागत असल्याने तेथे मध्यप्रदेशातून रेती येत असल्याची माहिती तहसीलदार अतुल पाटोळे यांना मिळाली. नायब तहसीलदार अजिनाथ गांजरे, मंडळ अधिकारी, तलाठी अशा पथकाने बिजुधावडी मार्गावरील गडगा मध्यम प्रकल्पावर जाणाºया मांडवा गावाजवळ सहा ओव्हरलोड रेती असलेले टिप्पर ताब्यात घेतले होते. दरम्यान, शुक्रवारी मध्यप्रदेशातील हरदा येथिल रेती पुरवठाधारक नितीन बिष्णोई व नितीन कलाम यांना बयान नोंदविण्याकरिता तहसील कार्यालयात बोलावण्यात आले. चौकशीअंती आठ ब्रासची क्षमता असताना त्या डंपरमध्ये नऊ ब्रास रेती असल्याचे निष्पन्न झाले. शासन परिपत्रका नुसार रेतीवाहतुकीची महाखनिज पोर्टलवर नोंदणी गरजेची होती. ती केली नसल्याने ती रेती अवैध असल्याचे आढळून आल्याने त्या सहाही ओहोरलोड टिप्पर वाहनांवर दंडात्मक कारवाईचे आदेश तहसीलदारांनी दिले. हरदा येथील नितीन बिष्णोई यांचे चार व नितीन कलाम यांच्या मालकीचे दोन डंपर आहेत.
कोट
टिप्परची तपासणी व मालकाचे बयान घेतल्यानंतर त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्रे आढळली नाही. त्यांनी केलेली रेती वाहतूक अवैध असल्याचे आढळून आल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली. दंडाची रक्कम भरल्यानंतर टिप्पर सोडण्यात येतील.
- अतुल पाटोळे,
तहसीलदार, धारणी
----------