शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

‘स्वाईन फ्लू’चे सहा बळी

By admin | Published: April 19, 2017 12:04 AM

संसर्गजन्य ‘स्वाईन फ्लू’ने आतापर्यंत अमरावती जिल्ह्यात चार बळी घेतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात या आजाराने बाधित १७ संशयितांवर उपचार सुरू आहेत.

संसर्गजन्य आजार : आरोग्य विभाग अलर्ट, शासकीय रूग्णालयांमध्ये उपचार सुविधाअमरावती : संसर्गजन्य ‘स्वाईन फ्लू’ने आतापर्यंत अमरावती जिल्ह्यात चार बळी घेतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात या आजाराने बाधित १७ संशयितांवर उपचार सुरू आहेत. ‘स्वाईन फ्लू’चा वाढता प्रसार पाहता उपाययोजनेबाबत आरोग्य विभागही अलर्ट झाला आहे.‘स्वाईन फ्लू’मुळे वंदना इंगोले (विलासनगर), विश्वनाथ खंडारे (कपीलवस्तूनगर),गजानन डोईफोडे (गगलानीनगर), मुकद्दर शाह अयुब शहा (रोशननगर), गणेश पिंपळकर (शिरजगाव कसबा) व सोमय्या परवीन (नांदगावपेठ) यांचा मृत्यू झाल्याची पृष्टी महापालिकेच्या आरोग्य विभागाने केली आहे. ५० संशयितांचे घेतले "स्वॅब"अमरावती : ‘स्वाईन फ्लू’मुळे पुणे, मुंबई, नाशिक व अकोला शहरात बळी गेले असून प्रवासातून ‘स्वाईन फ्लू’चा सर्वाधिक प्रसार झाल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्ह्यातही ‘स्वाईन फ्लू’वेगाने पाय पसरत आहे. आतापर्यंत ६ बळी गेल्याची माहिती आहे. इर्विनमध्ये आतापर्यंत ५० संशयितांचे स्वॅब घेण्यात आले असून १० रूग्ण स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आले आहेत. इर्विन रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ९ मध्ये दाखल केलेल्या ‘त्या’ मातेची २३ दिवसांची चिमुकली ‘स्वाईन फ्लू’ पॉझिटिव्ह आली होती.असा झाला संसर्ग गजानन डोईफोडे : गगलानीनगरातील रहिवासी गजानन डोईफोडे हे ६ फेब्रुवारी रोजी जबलपूर येथे गेले होते. १६ फेब्रुवारीला परत आल्यावर त्यांना ताप,सर्दी, खोकला व घसा दुखण्याचा त्रास जाणवला. त्यांनी प्राथमिक उपचार म्हणून ‘पॅरॅसिटीमॉल’ गोळ्या घेतल्या. त्यांना खासगी रुग्णालयात दाखविण्यात आले. मात्र, तरीही त्यांची प्रकृती खालावत असल्याचे पाहून नातेवाईकांनी महिन्याभरापूर्वी अकोला येथील ओझोन हॉस्पीटलला भरती केले. तेथे उपचारादरम्यान १३ एप्रिलला त्यांचा मृत्यू झाला. गणेश पिंपळकर : गगलानीनगरातील गणेश पिंपळकर हे शिरजगाव कसबा येथे कार्यरत होते. ते २१ जानेवारीला चिखलदऱ्याला गेले होते. ९ फेब्रुवारीला ते परतले. त्यानंतर ताप, सर्दी व श्वास घेण्यास त्रास जाणवला. त्यांनी परतवाड्यात आठवडाभर उपचार घेतले. त्यानंतर अमरावती येथे खासगी रुग्णालयात उपचार केलेत. त्यानंतर नागपूरला १८ मार्चला ते मरण पावले.वंदना इंगोले : विलासनगरातील रहिवासी वंदना इंगोले यांना २५ मार्च रोजी हलका ताप आला होता.खोकला असल्याने डॉक्टरांनी निमोनियाचा अंदाज वर्तवला. मात्र, २९ मार्च रोजी त्रास वाढल्याने त्यांना इर्विनमध्ये दाखल केले. मात्र, ३० मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला. जानेवारी महिन्यात पुण्याला गेले असताना प्रवासादरम्यान त्यांना या रोगाची लागण झाली असावी.सोमय्या परवीन : ७ जून २०१६ रोजी प्रसूतीसाठी नांदगाव पेठ येथे माहेरी गेल्या होत्या. ३ एप्रिलला त्यांना डफरीनमध्ये दाखल करण्यात आले. प्रसूतीनंतर त्यांना ताप, सर्दी झाली. ५ एप्रिलला त्यांना इर्विनमध्ये हलविण्यात आले. ६ एप्रिलला त्यांचा स्वॅब प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले. १० एप्रिलला नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मुक्कदर शाह :रोशननगर येथील मुक्कदर शाह यांनी १० एप्रिल रोजी सर्दी-खोकला झाल्याने खासगी रुग्णालयात उपचार घेतले. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने ते १३ एप्रिल रोजी अन्य खासगी रुग्णालयात गेले. डॉक्टरांना स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्याने १४ एप्रिल रोजी मुक्कदर शाह इर्विनला भरती झाले. त्यांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले. १७ एप्रिलला त्यांचा मृत्यू झाला. विश्वनाथ खंडारे : कपीलवस्तूनगर येथील ६० वर्षीय विश्वनाथ खंडारे यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. त्यांना स्वाईन फ्लू संशयित म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विशेष कक्षामध्ये हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांना स्वाईन फ्लूची बाधा नेमकी कशी झाली, याबाबतची माहिती मिळू शकली नाही. चार दिवसांपूर्वी त्यांना तापामुळे खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथे त्यांनी उपचाराला दाद दिली नाही. ‘स्वाईन फ्लू’चे आतापर्यंत १४ पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. या रोगावरील प्रतिबंधात्मक औषधांची सुविधा सर्व जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करुन देण्यात आली आहे.-नितीन अंबाडेकर, आरोग्य उपसंचालक