शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
3
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
4
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
5
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
7
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
8
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
9
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
10
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
11
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
12
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
13
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
14
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
15
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
16
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
17
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
18
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
19
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
20
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये अमरावतीचे सहा धावपटू धावणार

By जितेंद्र दखने | Published: May 24, 2024 9:42 PM

डर्बन शहरात ९ जून रोजी स्पर्धा, अमरावतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला

अमरावती: जगातील सर्वांत खडतर मॅरोथॉन पैकी एक असलेली ९० कि.मी. ची कॉम्रेड मॅरोथॉन स्पर्धा येत्या ९ जून २०२४ रोजी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन, पिटरमटिर्झबर्ग येथे होणार आहे. या स्पर्धेत १३२ देशांमधून धावपटू सहभाग नाेंदवित असून, अमरावती येथील सहा धावपटू सहभागी होणार आहेत. यात जिल्ह्यातील एकमेव ४३ वर्षीय महिला सलग दुसऱ्यांदा सहभागी होणार आहे.

कॉम्रेड ९० कि.मी. मॅरोथॉनला अल्टिमेट ह्युमन रेस म्हणून ओळखल्या जाते. यावर्षी ९७ वी मॅरेथॉन दक्षिण आफ्रिकेतील डर्बन शहरापासून सकाळी ५.३० वाजता सुरू होणार असून, ती पिटरमटिर्झबर्ग या शहरामध्ये संध्याकाळी ५.३० वाजता समारोप होणार आहे. या स्पर्धेत अमरावती जिल्ह्यातील सेवा निवृत्त विक्रीकर उपायुक्त दिलीप पाटील, पोलिस निरीक्षक अनिल कुरळकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता मंगेश पाटील, पोलिस कर्मचारी राजेश कोचे, पोलिस निरीक्षक सतीश उमरे व म्हाडाच्या उपअभियंता दीपमाला साळुंखे (बद्रे) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे दिलीप पाटील यांनी कॉम्रेड मॅरेथॉन ही सलग आठवेळा यशस्वीरीत्या पूर्ण केली असून, यावर्षी ते नवव्यांदा सहभाग घेत आहेत, तर दीपमाला साळुंखे यांनी सन २०२३ मध्ये ही स्पर्धा ११ तास ५० मिनिटांमध्ये पूर्ण केली होती. हे सहा धावपटू अमरावती येथून येत्या दि. ४ जून रोजी अमरावती दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना होणार आहे.पाच महिन्यांपासून सरावअमरावती येथील पाच स्पर्धकांची तयारी दिलीप पाटील यांनी जानेवारी २०२४ पासून सुरू केली होती. पाच महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून हे स्पर्धक कॉम्रेड मॅरेथॉनसाठी रवाना होत आहे. या प्रशिक्षणादरम्यान सर्व स्पर्धकांनी २ वेळा ६० कि.मी.चे लाँग रन, तर ४२ ते ५० कि.मी वर तसेच दर रविवारी किमान ३६ किमीचे लाँग रन पूर्ण केले आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती