गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सरासरीपेक्षा कमी पाऊस व तीन आठवड्यांचा खंड यामुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यांना दुष्काळाचा प्रथम ट्रिगर लागू झाला. मात्र, दुष्काळाच्या दुसऱ्या ट्रिगरनंतर तालुकास्तरावर १० गावे रँडम पद्धतीने निवडून विहित मापदंडानुसार सत्यापन करावे लागणार आहे. यासाठी क्षेत्रीय व तालुका समितीला अहवाल जिल्हा समित्यांना पाठवावा लागणार आहे.शासनाने आता दुष्काळ घोषित करण्यासाठी ७ आॅक्टोबर २०१७ च्या निकषाप्रमाणे नवी कार्यपद्धती निश्चित केली आहे. त्यानुसार खरिपाचा दुष्काळ ३१ आॅक्टोबरला शासन जाहीर करणार आहे.जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अद्यापही ७५ टक्क्यांच्या आत पावसाची नोंद आहे. यामध्ये सर्वात कमी मोर्शी ६५.२ टक्के, वरुड ६५.४, भातकुली ७१.९, अंजनगाव सुर्जी ७३, अचलपूर ७४.३ व चिखलदरा तालुक्यात ६६.१ टक्के पावसाची नोंद झाली. त्यामुळे या तालुक्यांत आता सर्वेक्षण/सत्यापन होणार आहे.दुष्काळाची दुसरी कळ लागू झालेल्या सहा तालुक्यातील १० गावे जिल्हाधिकारी रँडम पद्धतीने निश्चित करतील. या गावामधील प्रमुख पिकांची निवड करताना प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रमुख पीक ठरविण्याच्या व्याख्येनुसार गावात एकूण पीकपेरणी झालेल्या क्षेत्रापैकी २५ टक्के ज्या पिकाचे क्षेत्र आहे, ते पीक प्रमुख पीक ठरविण्यात येणार आहे.निवड केलेल्या गावातील प्रमुख पिकांचा सर्व्हे/गट नंबर ठरविताना गावातील एकूण सव्हे /गट नंबरची संख्या विचारात घेतली जाणार आहे व या संख्येमधून रँडम पद्धतीने हा गट निवडण्यात येणार आहे आणि हे पीक एक हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर असल्याची खात्री करण्यात येणार आहे. या गटामधील पीक, शेतकºयांची माहिती, पिकाची सद्यस्थिती, पिकाचे छायाचित्र याविषयीची माहिती मोबाइल अॅपवर अपलोड करावी लागणार आहे. खरीप हंगामातील पिकांची कापणी करण्यापूर्वी अशाप्रकारे सर्वेक्षण/सत्यापन करावे लागणार आहे.सत्यापनासाठी मोबाईल अॅपमहाराष्ट्र सुदूर सर्वेक्षण यंत्रणा (एमआरएसएसी) यांच्यामार्फत सत्यापनासाठी मोबाइल अॅप तयार करण्यात आले आहे. तूर्तास पीक विमा योजनेसाठी वापरात येणाºया अॅपद्वाराच सत्यापन करण्याच्या सूचना आहेत. अशा क्षेत्रातील पिकांचे सद्यस्थिती दर्शविणारे छायाचित्र व सर्वेक्षण करणारे क्षेत्र येईल अशा प्रकारचे छायाचित्र घ्यावे लागणार आहे व संगणकीय प्रणालीमध्ये अपलोड करून त्याचे विश्लेषण करावे लागेल.जिल्ह्याचाच समावेश करावाअलीकडच्या पावसाचा फायदा तूर पिकाला झाला. मात्र, पावसाचे १२० दिवसापैकी ११० दिवस टक्केवारी ही ७५ टक्क्यांच्या आतच राहिली व खरिपावर संकट ओढवले. याचा विचार जिल्हा समितीने करावा व कृषी आयुक्तालयास अहवाल सादर करावा, अशी शेतकºयांची मागणी आहे.
अशी आहे क्षेत्रीय व तालुका समितीरँडम पद्धतीने निवडलेल्या गावातील सत्यापनासाठी आता मंडळ कृषी अधिकारी, कृषी अधिकारी (पंचायत), व मंडळ अधिकारी (महसूल) यांची क्षेत्रीय स्तरावर समिती आहे. यांचा अहवाल तालुक्याला गेल्यावर तहसीलदार, गट विकास अधिकारी,व तालुका कृषी अधिकारी यांची तालुका समिती रॅण्डम पद्धतीने एका गावाची तपासणी करून अहवाल जिल्हा समितीला पाठविणार आहे.सहा तालुक्यात अपुऱ्या पावसाअभावी दुष्काळस्थिती आहे. या ठिकाणी रँडम पद्धतीने १० गावांची निवड करून ‘एमआरएसएसी’च्या मोबाइल अॅपद्वारे छायाचित्र व त्याचे विश्लेषण करून जिल्हा समितीला अहवाल पाठविली जाईल.- अनिल इंगळेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी