शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

सहा वर्षांत ‘ट्रायबल’मधून ३२८७ महाविद्यालये गायब, शिष्यवृत्ती तपासणीचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 4:43 PM

आदिवासी विकास विभागातून शिष्यवृत्तीची उचल करणारे तब्बल ३२८७ महाविद्यालये गायब झाले आहेत. ही आकडेवारी अलीकडच्या सहा वर्षांतील असून, ई- ट्रायबल वेबसाईटवर याविषयी माहिती उपलब्ध आहे.

- गणेश वासनिक 

अमरावती - आदिवासी विकास विभागातून शिष्यवृत्तीची उचल करणारे तब्बल ३२८७ महाविद्यालये गायब झाले आहेत. ही आकडेवारी अलीकडच्या सहा वर्षांतील असून, ई- ट्रायबल वेबसाईटवर याविषयी माहिती उपलब्ध आहे.राज्यात सन २०१३-२०१४ या वर्षांत अनुसूचित जाती व जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती घोटाळा उघडकीस आला होता. घोटाळ्याची व्याप्ती प्रचंड मोठी असल्याने तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विशेष चौकशी पथक (एसआयटी)चे गठन केले होते. त्यानुसार राज्यात चांद्यापासून तर बांध्यापर्यंतचे विद्यालये, महाविद्यालयांचे एसआयटीने सर्चिंग केले. यात एससी, एसटी संवर्गातील विद्यार्थ्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती प्राचार्य, संस्थाचालकांनी हडप केल्याची बाब एसआयटीने शासनाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर महाविद्यालयांचे संस्थाप्रमुख, प्राचार्यांसह अन्य दोषींवर कारवाईची गाज कोसळली. शिष्यवृत्ती घोटाळ्यांमुळे शैक्षणिक संस्थाचालकांचे खरे चेहरे समोर आले. मात्र, शिष्यवृत्ती घोटाळ्यात भविष्यात तुरूंगाची हवा खावी लागेल, या भीतीपोटी अनेक शैक्षणिक संस्थांनी शिष्यवृत्तीप्रकरणी सावध भूमिका घेतली. परिणामी आदिवासी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीची उचल करणाºया महाविद्यालयांचे सन २०१२ ते २०१८ या सहा वर्षांत लेखाजोखा बघितला तर सरतेशेवटी विद्यार्थी संख्येत कमालीची घसरण झाल्याचे दिसून येते. सन २०१२-२०१३ या वर्षात ७२९६ महाविद्यालयांकडून १,५६,२६० विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी प्रवेशित होते. त्यापैकी ९०,२९१ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ घेतला, तर ६५,९५९ विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले. शिष्यवृत्तीसाठी १२१.१२ लाख रूपये खर्च झाले. मात्र, सन २०१७-२०१८ या वर्षात ४००९ महाविद्यालयांकडून ९३,१३९ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी प्रवेशित होते. त्यापैकी ५०,३७६ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून ४२,७६३ विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले. यावर्षी ९४.४२ लाख रुपये शिष्यवृत्तीवर खर्च झाला. विद्यार्थ्यांचे प्रवेश आणि महाविद्यालयांची संख्या हा निरंतर प्रवास असताना शिष्यवृत्ती उचल करण्यापासून सहा वर्षांत ३२८७ महाविद्यालये अचानक कसे गायब झालेत आणि ६३ हजार १२१ आदिवासी विद्यार्थी गेले कुठे, असा सवाल त्यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

सहा वर्षांतील शिष्यवृत्तीचे वास्तव     वर्ष    महा. संख्या    प्रवेशित विद्यार्थी    लाभार्थी    वंचित    एकुण                     विद्यार्थी    खर्च    २०१२-१३    ७२९६    १५६२६०    ९०२९१    ६५९६९    १२१.१२    २०१३-१४    ७२९८    १७२४५३    १४५२२१    २७२३२    २२०.१२    २०१४-१५    ६६९५    १६५६३८    ११७३२१    ४८३१७    १८५.५३    २०१५-१६    ६६५७    १७६९५६    १६३१७४    १३७८२    २२७.०६    २०१६-१७    ६१६०    १६६४८८    १२६५६०    ३९९२८    १८७.५६    २०१७-१८    ४००९    ९३१३९    ५०३७६    ४२७६३    ९४.४२

टॅग्स :educationशैक्षणिकAmravatiअमरावती