मे ते आॅक्टोबर २०१४ मधील नुकसान : ३७ हजार हेक्टरमधील पीके होती बाधित अमरावती : जिल्ह्यात मे ते आॅक्टोबर २०१४ मध्ये अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे ३६ हजार ८४६ हेक्टरमधील शेतीपिके व फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. १ लाख ९ हजार ९३७ शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला होता. यासाठी शासनाने १७ मार्च रोजी १७ कोटी ५२ लाखांचा निधी मंजूर केला होता. हा निधी जिल्हा प्रशासनाने बुधवारी सर्व तालुक्यांना वितरित केला. पुढच्या आठवड्यात हा निधी बाधीत शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यात जमा होणार आहे. सन २०१४ मध्ये मे ते आॅक्टोबर दरम्यान अवकाळी पाऊस, गारपीट व अतीवृष्टी यामुळे जिल्ह्यातील १ लाख ९ हजार शेतकऱ्यांच्या ३६ हजार ८४६ क्षेत्र बाधीत झाले. यामध्ये भात पिकाचे २० आर, कपाशी ५ हजार ८०८ हेक्टर, सोयाबीन १० हजार ४१ हेक्टर, तूर १६ हजार ५४२ हेक्टर, मूग व उडीद ३ हजार १८५ हेक्टर, ज्वारी ६५ हेक्टर, व इतर १८६ हेक्टर शेतीपीकांचे नुकसान झाले आहे. तसेच फळपीकांमध्ये ५१७ हेक्टर संत्रा, ५०० हेक्टर केळी असे एकूण १ हजार १७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. या बाधीत क्षेत्राला ३० जानेवारी २०१४ चे शासन निर्णयानुसार कोरडवाहू क्षेत्रास ४ हजार ५०० हेक्टर,ओलीताखालील पिकांना ९००० रुपये हेक्टर, बहुवार्षिक फळपिकांसाठी १२ हजार रुपये प्रती हेक्टर, रुपये वाटप करण्यात आले आहे. खरीप २०१४ (अवर्षण) मध्ये वाटप रक्कम वगळता उर्वरित रक्कम विशेष बाब म्हणून कोरडवाहू ५ हजार ५०० रुपये, ओलीताखाली ६ हजार रुपये व बहुवार्षीक पिकांकरिता १३ हजार रुपये हेक्टर या प्रमाणे प्रती हेक्टर या प्रमाणे दोन हेक्टर या मर्यादित वाटप करण्यात येणार आहे. या मदतीमधून बँकेने शेतकऱ्यांची कर्जकपात व अन्य कुठलीही कपात करु नये असे निर्देश आहे. २००७ मधील घरांच्या नुकसानीसाठी साडेसात कोटी मंजूर जिल्ह्यात २००७ मध्ये अतिवृष्टी व पूर नुकसान झालेल्या ४३ गावामधील ४ हजार १२२ घरांच्या बांधकामास लाभार्थी घर बांधणार या तत्वावर शासनाने मान्यता दिली. यासाठी शासनाने १० कोट ६६ लाख ९० हजार इतका निधी मंजूर केला व यापैकी ७० टक्के म्हणजे ७ कोटी ४६ लाख ८३ हजार इतका निधी शासनाने जिल्ह्याला वितरित केला आहे.हा निधि ३१ मार्च २०१६ पर्यंत बाधितांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
साडेसतरा कोटींची मदत वितरित
By admin | Published: March 24, 2016 12:35 AM