अनिल कडू।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : कारला ते अंजनगाव-परतवाडा-बहिरम दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या ५ हजार ४६ झाडांची कत्तल होत आहे. ही झाडे केवळ ४५ लाखांत विकली गेलीत. यात १ कोटी ३५ लाखांचा घोळ असून, ही झाडे विकताना ना ई-टेंडरिंग केले गेले, ना ओपन आॅक्शन पार पडला.भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून अकोट-परतवाडा-बैतूल मार्गाचे काम बहिरमपर्यंत केल्या जात आहे. याकरिता राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता (अकोला) यांनी कारला ते बहिरम दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे तोडण्याची परवानगी वनविभागाकडे मागितली. यावर परतवाडा येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी १३१ सागवान आणि ४ हजार ९१५ आडजात मिळून ५ हजार ४६ झाडांच्या तोडीची परवानगी त्यांना दिली. त्यांनी वनविभागाकडून या झाडांचे मूल्यांकनही करून घेतले. अमरावती सर्कलच्या प्रचलित पद्धती व प्रचलित दरानुसार या झाडांचे मूल्यांकन १ कोटी ८० लाख निर्धारित केले गेले. पण, हे मूल्यांकन बदलविण्याकरिता वरिष्ठ पातळीवरून दबावतंत्राचा वापर केल्या गेला. मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय) वीरेंद्र तिवारी यांच्या पत्राच्या अनुषंगाने यात फेरमूल्यांकन पार पाडले गेले. १ कोटी ८० लाखाचे मूल्यांकन केवळ ४५ लाखांवर आणले गेले. याकरिता यवतमाळ सर्कलचे दर लावल्या गेलेत.मूल्यांकन कमी करून घेतल्यानंतर कार्यकारी अभियंत्यांनी ही झाडे आपल्या स्तरावर एम.एस. खुराणा इंजिनीअरिंग कंपनीला ४५ लाखांत विकली. कंपनीने ही झाडे प्रमोद सारंगधर खोंड (रा. नांदुरा, जि. बुलडाणा) यांना विकलीत. ही ४५ लाखांची झाडे विकताना कार्यकारी अभियंत्यांनी ई-टेंडरिंग किंवा ओपन आॅक्शनची प्रक्रिया पार पाडली नाही.दरम्यान, याच रस्त्यावर विना परवानगी मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड केली जात आहे. यातील आडजातीची ३५ झाडे परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी जप्त करून शासनजमा केली आहेत, तर प्रमोद सारंगधर खोंडविरुद्ध प्रथम गुन्हा रिपोर्टही दाखल केला. या कारवाईनंतरही अवैध वृक्षतोड सुरूच आहे. लाकूड वाहतुकीकरिता लागणाºया प्रत्येक वाहतूक पास (टी.पी.) करिता प्रत्येकी पाच हजार रुपये मोजावे लागत असल्याचे सांगितले जात आहे. या अवैध वृक्षतोड प्रकरणात अण्णासाहेब सावंत (रा. जालना) यांनी कार्यकारी अभियंता आर.बी. झाल्टे यांच्या विरोधात अमरावती येथील उपवनसंरक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. कार्यकारी अभियंत्यांनी विनापरवाना वृक्षतोड करित परस्पर विल्हेवाट लावून कोट्यवधीचा अपहार केल्याचे त्या तक्रारीत म्हटले आहे. यात भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सावंत यांनी केली आहे. दुसरीकडे झाडांची मालकी कार्यकारी अभियंत्यांची असल्यामुळे त्यांनी कारवाई करणे गरजेचे असल्याचे वनविभागाने सावंत यांना कळविले आहे.वनविभागाकडून पत्र प्राप्त झाले आहे. पत्राच्या अनुषंगाने अजूनपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही.- आर. बी. झाल्टेकार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, अकोला.अमरावती सर्कलच्या दरानुसार निघालेले १ कोटी ८० लाखाचे मूल्यांकन यवतमाळचे दर लावल्यामुळे फेरमूल्यांकनात ४५ लाख आले.- ए.डब्ल्यू. सविटकर, सहायक उपवनसंरक्षक, अमरावती.
अंजनगाव-बैतुल मार्गावर हिरव्या झाडांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 9:55 PM
कारला ते अंजनगाव-परतवाडा-बहिरम दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या ५ हजार ४६ झाडांची कत्तल होत आहे. ही झाडे केवळ ४५ लाखांत विकली गेलीत. यात १ कोटी ३५ लाखांचा घोळ असून, ही झाडे विकताना ना ई-टेंडरिंग केले गेले, ना ओपन आॅक्शन पार पडला.
ठळक मुद्देपाच हजार झाडे केवळ ४५ लाखांत : १ कोटी ३५ लाखांचा घोळ; ना ‘ई’ टेंडरिंग, ना ‘ओपन’ आॅक्शन