शेतकऱ्याच्या तक्रारीला केराची टोपली : कार्यालयीन मजुराचा प्रतापनरेंद्र जावरे परतवाडानजीकच्या खतिजापूर येथील लघु प्रकल्पाच्या कॅनलवरील झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करून कार्यालयातील मजुराने ती झाडे परस्पर विकली, अशी तक्रार शेतकऱ्याने केली आहे. परसापूर ते टेंब्रुसोंडा रस्त्यावरील खतिजापूर ग्रामपंचायतींतर्गत लघुसिंचन प्रकल्प आहे. खतिजापूर, परसापूर व टवलार परिसरातील जवळपास पाचशे हेक्टर शेतजमिनीला ओलीत देण्यासाठी याचा वापर करण्यात येतो. १९६५ मध्ये तयार करण्यात आलेल्या या लघु प्रकल्पातून शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था व्हावी, हा उद्देश होता. मात्र, पाणीवाटप संस्थांचा मनमर्जी कारभारामुळे शेतकऱ्यांचीपिके वाळत असल्याचा गंभीर आरोप देखील शेतकऱ्यांनी केलवा आहे. खतिजापूर लघु प्रकल्पातून शेतात पाणी पोेहोचविण्यासाठी कॅनल तयार करण्यात आले. मागील ५० वर्षांत त्यावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. आता ती झाडे मोठी झाली आहेत. तर कॅनलमध्ये मात्र झुडुपांचे साम्राज्य वाढले आहे. या संपूर्ण प्रकरणाची तक्रार झाल्यावर अचलपूर येथील तहसीलदारांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात करण्याचे आदेश दिले होते, असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.उपविभागीय अभियंत्याची टोलवाटोलवीया संपूर्ण प्रकरणाबाबत अमरावती येथील पाटबंधारे उपविभागातील उप अभियंता बी.बी. तिनखेडे यांच्याशी लोकमतने याबाबत संपर्क केला असता त्यांनी केवळ तीन झाडे वाऱ्याने पडली होती. त्यांचा लिलाव करण्यात आल्याचे सांगितले. प्रारंभी त्यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत अनभिज्ञता दर्शविली. सदर मजूर गेल्या अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी असल्याने त्याचे मनोबल वाढल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. लिलाव न करताच विल्हेवाट खतिजापूर प्रकल्पाच्या कॅनलच्या देखरेखीची जबाबदारी सुरेश पडोळे नामक कार्यालयीन मजुरावर आहे. हा मजूर येथील शासकीय निवासस्थानात राहतो. मात्र, त्याने जवळपास ५० पेक्षा अधिक झाडांची विनापरवानगी कत्तल केल्याची तक्रार कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता, तहसीलदार यांच्याकडे शेतकरी महेंद्र माधव रोडे यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर या झाडांचा लिलाव न करता त्यांची परस्परच विल्हेवाटही लावल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या बाबीची कोणतीच दखल घेतलेली नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन अवैध वृक्षतोड कोणी व कधी केली याची चौकशी करण्यात येईल तर पंचवीसशे रूपयांमध्ये वन विभागाकडून परवानगी घेऊन तीन झाडांचा लिलाव करण्यात आला. बी.बी. तिनखेडे, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे उप-विभाग, अमरावती.
कालवा परिसरात झाडांची कत्तल
By admin | Published: January 20, 2016 12:30 AM