अमरावती :स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत हागणदारीमुक्त अधिक (ओडिएफ प्लस ) कार्यक्रम सक्रिय करण्याच्या दृष्टीने ओडिफ प्लस या विषयावर घोषवाक्य लेखन स्पर्धेचे आयोजित केली आहे.
हागणदारीमुक्त अधिक हि संकल्पना जणमानसात रूजावी व शाश्वत स्वच्छते बाबात लोकांमधे जाणीव जागृती होण्याच्या उद्देशाने दिनांक १ सप्टेंबर ते १५ ऑक्टोंबर या कालावधीत स्पर्धा होणार आहे. यात जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना सहभागी घेता. येणार आहे. हागणदारीमुक्त अधिक (ओडिएफ प्लस )या संकल्पनेतील प्रत्येक घटकावर (शौचालयांचा नियमीत वापर, लहान मुलांच्या विष्ठेचे व्यवस्थापन, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, गोबरधन,ओला सुका व प्लॅस्टिक कचरा विलगीकरण )अधीकाधीक घोषवाक्यांचे लेखन करावे लागेल. सर्व घोषवाक्य (संदेश )गावातील सार्वजनिक शाळा, सभागृह, सरकारी दवाखाने, बाजारपेठा पोस्ट ऑफिस, बस स्थानक, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा अंगणवाडी सार्वजनिक ईमारती व दर्शनीय भागात रंगविण्यात यावेत. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणार्या ग्रामपंचायतींना २ ऑक्टोंबर रोजी जिल्हास्तरावर गौरविले जाणार असल्याची माहिती स्वच्छ भारत मिशन उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांनी दिली.