लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघासाठी मंगळवारी सकाळी ८ वाजता विभागातील ७७ मतदान केंद्रांवर उत्साहात सुरुवात झाली. मात्र, पहिल्या दोन तासांत १०.११ टकेच मतदान झाले. अमरावती जिल्ह्यात ९.६४ अकोला ९.३४ वाशिम ११.९६, बुलढाणा १०.९ व यवतमाळ जिल्ह्यात १०.५१ टक्के मतदान झाले.शहरी भागात गर्दी दिसत असली तरी ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवर शुकशुकाट दिसून आला. निवडणूक विभागाने सध्या तरी पूर्ण खबरदारी घेतल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक मतदाराची आरोग्य तपासणी, मतदानासाठी फिजिकल डिस्टन्स ठेवून रांगा. दिव्यांगासाठी व्हील चेअर व लक्षणे आढळल्यास प्रत्येक मतदान केंद्रावर विलगीकरण कक्ष तयार ठेवण्यात आले आहेत.
अमरावतीमध्ये कोरोनाचे सावटात सावकाश मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2020 11:07 AM