दुकाने भाडेतत्त्वावर घेऊन व्यवसायावर उदरनिर्वाह करणारे संकटात आले आहेत. त्यामुळे यापुढे लॉकडाऊन करू नये, अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मार्चपासून कोरोनाचा प्रभाव वाढत गेल्याने सात महिन्यांपासून सतत लॉकडाऊन वाढतच चालले आहे. लॉकडाऊन केले नाही, तर रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. घरात होणारा कौटुंबिक खर्च कायम आहे. परंतु, येणारी आवक लॉकडाऊनमुळे बंद पडली. पूर्वीसारखे सुरळीत केव्हा होणार हे आताच कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांपुढील अडचणी वरचेवर वाढत चालल्या आहेत.
-----------------------------------------------------------------
ज्या व्यवसायावर रोजी-रोटी चालते, तो व्यवसाय सारखा बंद ठेवावा लागत असल्याने अडचणीत भर पडली आहे.
- युवराज श्रीवास, सलून व्यावसायिक
--
रोजच्या व्यवसायातून घरखर्च भागत होता. गेल्या सात महिन्यांत बँकेत ठेवलेली जमापुंजीही संपली. आता भांडवल आणायचे कोठून?
- आनंद सुरजुसे, भाजीपाला व्यावसायिक