अमरावती : अमरावती व भातकुली तालुक्यातील शेतकरी-शेतमजुरांना शासनांच्या अन्न सुरक्षा योजनेमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला ७/१२वर शासनातर्फे दोन रुपये किलो गहू व तीन रुपये किलो तांदुळ अशाप्रमाणे दिले जाईल. या योजनेचा शुभारंभ नुकताच आमदार रवि राणा यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये अमरावती व भातकुली तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांनी सहभाग दर्शवीला. यावेळी आमदार रवि राणा यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी हितगुज करुन व त्यांची मते जाणून या संपूर्ण योजनेची विस्तारपूर्वक माहिती दिली. तसेच या योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला तातडीने मिळावा. याकरीता तहसिलदार, तलाठी व मंडळ अधिकारी यांना गावा-गावात जाऊन शेतकऱ्यांना ७/१२ वाटून हि योजना घरा घरात पोहचविण्याकरीता १५ दिवसाच्या आत राबविण्याचे आदेश दिले. जर १५ दिवसाच्या आत ही योजना राबविली तरच खऱ्या अर्थाने या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल असे सुध्दा स्पष्ट केले आहे. वरुन राजा व देवाच्या कृपेने पाऊस पडल्याबद्दल त्यांचे आभार म्हणून आमदार रवि राणा यांनी संपूर्ण शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जलपुजन सुध्दा केले. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी शासनाने शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात रेशन देण्याचा निर्णय घेतला आहे. जे शेतकरी अन्न सुरक्षा योजना २०१३ या अंतर्गत समाविष्ट होऊ शकले नाही, अशा शेतकऱ्यांना व कुटुंबातील सर्व सदस्यांना प्रतिमाह पाच किलो धान्य सवलतीच्या दरात देण्याची १५ आॅगस्ट रोजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी जिल्ह्यात शुभारंभ केला होता. आता सर्व तालुकास्तरावर संबंधित लोकप्रतिनिधींच्या हस्ते लाभार्थी शेतकऱ्यांना रेशन धान्याचे वाटप करण्यात येत आहे.याप्रसंगी गोकुलदास उपाध्याय, हर्षद वाचासुंदर, संजय चुनकिकर, राजू तेलमोरे, प्रकाश खर्चान, राजू हरणे, मिलींद अवघड, शंकर डोंगरे, किरण भोपसे, अनिल तिडके, प्रदिप मोहोड, चंदु पाटील, रामदास रंगारी, श्रीकृष्ण पाटील, सुमित गुल्हाने, महेंद्र सिरसाट, दिनेश इंगळे, गुरुदास दुर्गे, पद्माकर गुल्हाणे, राजु रोडगे, देवानंद इंगळे व आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांना ७/१२ वर अल्पदरात गहू, तांदूळ
By admin | Published: August 23, 2015 12:37 AM