आॅनलाईन लोकमतअमरावती : बोंडअळीपासून १०० टक्के बचाव शक्य आहे. यासाठी उपाय छोटे परंतु, फायदे मोठे आहेत. फेब्रुवारी अखेरपर्यंत शेतशिवार कपाशीमुक्त करा, याशिवाय सुचविलेल्या दशसूत्रीचा वापर करा, असे आवाहन नवी दिल्लीच्या ‘एएसआरबी’चे माजी अध्यक्ष व बोंडअळी नियंत्रण अभियानाचे अध्यक्ष डॉ. सी.डी मायी यांनी केले.येतील श्री शिवाजी कृषी महाविद्यालय व डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संयुक्त विद्यमाने बुधवारी आयोजित बोंडअळी नियंत्रण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्र्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, प्राचार्य नंदकिशोर तिखिले, पीकेव्हीच्या निम्न कृषी शिक्षणाचे विभागाचे अधिष्ठाता डी.बी. उंदीरवाडे, विस्तार व शिक्षण विभागाचे संचालक डी.एम. मानकर, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ व प्राध्यापक उपस्थित होते.इंडियन सोसायटी फॉर कॉटन इंम्प्रुव्हमेंट, साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटर व अॅग्रोव्हिजन फाऊंडेशनद्वारा गुलाबी बोंडअळी नियंत्रण अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी भितीपत्रकाच्या सहाय्याने जनजागृती व्हावी, हा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगीतले. बोंडअळी नियंत्रनासाठी बाजार समित्या, कॉटन मिलमध्ये कामगंध व प्रकाश सापळे लावा, जमिनीची खोल नांगरणी करून जमीन तापू द्या, मान्सून पावसावर नवीन लागवड करा, पूर्वहंगामी कपाशी लावू नका आदी उपाययोजना सुचवित बोंडअळीवर नियंत्रण सहज शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे संचालन समीर लांडे आभार प्रमोद देशमुख यांनी मानले.बोंडअळी नियंत्रणासाठी हे महत्त्वाचेबोंडअळीचे नियंत्रण सहज शक्य आहे, यासाठी १४० ते १६० दिवसांत येणारे वाण निवडा व बीटी कपाशीसोबत रेफ्युजी पिकांचा पेरा करा, कपाशीभोवती सापळा पीक म्हणून एखादी ओळ भेंडीची लावा, आॅगस्टपासून पिकात कामगंध सापळे लावा, गरजेनुसार फवारणी करा, कीटकनाशके, संजिवकांचे मिश्रण करून फवारणी टाळावी उपाययोजना गावपातळीवर एकाचवेळी योजल्यास बोंडअळीचे नियंत्रण सहज शक्य असल्याचे मायी यांनी सांगितले.
बोंडअळीच्या नियंत्रणासाठी ‘उपाय छोटे, फायदे मोठे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 10:49 PM
बोंडअळीपासून १०० टक्के बचाव शक्य आहे. यासाठी उपाय छोटे परंतु, फायदे मोठे आहेत.
ठळक मुद्देसी.डी. मायी : कृषी महाविद्यालयात बोंडअळी नियंत्रणावर कार्यशाळा