शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
2
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
3
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
4
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
5
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
6
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
7
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
8
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
9
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
10
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
11
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
12
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
13
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
14
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
15
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
16
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
17
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना
18
भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...
19
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका! ३ अब्ज डॉलर्सच्या करारवर सही झाली, पण...
20
"उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुकीची घोषणा, त्यामागे षडयंत्र तर नाही ना?’’ ठाकरे गटाला शंका

शुक्रवारी ठरणार स्मार्ट सिटीचा चेहरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2016 12:40 AM

स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी अनिवार्य असणाऱ्या एसपीव्ही (स्पेशलपर्पज व्हेईकल) या शासकीय कंपनीची

एसपीव्हीची बैठक : ५० कोटींचा निधी मिळणार अमरावती : स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी अनिवार्य असणाऱ्या एसपीव्ही (स्पेशलपर्पज व्हेईकल) या शासकीय कंपनीची दुसरी बैठक ११ नोव्हेंबरला महापालिकेत होत आहे. संचालक मंडळाच्या याबैठकीत पहिल्या हप्त्यात मिळणाऱ्या ५० कोटी रूपयांचे नियोजन केले जाणार आहे. ‘पॅनसिटी’ अंतर्गत हे ५० कोटी खर्च केले जाणार आहेत. राज्य उच्चाधिकार समितीने स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निवडलेल्या ८ शहरांमध्ये राज्यस्तरावर स्मार्ट सिटी प्रकल्प राबविण्यास नगरविकास विभागाने ४ महिन्यांपूर्वी मंजुरी दिली. याआठमध्ये अमरावती महानगराचा समावेश होता. स्मार्ट सिटी प्रकल्प राबविण्यासाठी ‘सिडको’ ही एजन्सी अमरावती महापालिकेला १०० कोटी रूपयांचे अनुदान देणार आहे. मात्र, तत्पूर्वी विशेष उद्देश वाहन ‘एसपीव्ही’चे गठन करण्याचे बंधन घालण्यात आले होते. एसपीव्हीच्या स्थापनेनंतरच ५० कोटींचा पहिला हप्ता ‘रिलिज’ करण्यात येणार असल्याने आॅक्टोबरमध्ये नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवाल यांच्या अध्यक्षतेखाली १५ सदस्यीय संचालक मंडळाच्या ‘एसपीव्ही’ची स्थापना करण्यात आली. त्यानंतर ५० कोटींचा पहिला हप्ता मिळविण्याचा मार्ग प्रशस्त झाला. त्याअनुषंगाने ११ नोव्हेंबरला ‘एसपीव्ही’च्या संचालक मंडळाची बैठक होत आहे. पॅनसिटी संकल्पेनुसार शहराच्या विकासासाठी नियोजन केले जाणार आहे. पोरवाल यांच्यासह महापौर, स्थायी समिति सभापती, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, नगररचना विभागाचे सहायक संचालक निर्मला बोरकर व तुषार भारतीय यांच्यासह कंपनीचे सीईओ महेश देशमुख यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे.