मोबाईल मिसींगबाबत तक्रारी प्राप्त होताच सायबर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक सीमा दाताळकर यांची ‘सायबर पोलीस टिम‘ कामाला लागते. मोबाईलबाबत सखोल माहिती प्राप्त करुन, तांत्रिक विश्लेषन करुन १८ लाख ९८ हजार ३८४ रुपये किमतीचे एकूण १४८ मोबाईलचा शोध घेण्यात ‘टिम सायबर’ ने यश मिळविले.
शुक्रवारी पोलीस आयुक्त डाॅ. आरती सिंह, पोलीस उपायुक्त विक्रम साळी व शशिकांत सातव, एसीपी लक्ष्मण डुंबरे यांचे हस्ते ते मोबाईल मुळ मालकांना वितरित करण्यात आले. आपला हरविलेला मोबाईल प्राप्त झाल्याने उपस्थितांना अतिशय आनंद झाला. त्याबाबत पोलीस आयुक्त आरती सिंह व शहर पोलीस दलाचे मनापासून आभार व्यक्त केले.
ही कामगिरी सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर, एपीआय रविंद्र सहारे, पीएसआय कपील मिश्रा, जगदीश पाली, चैतन्य रोकडे, दीपक बदरके, संजय धंदर, शैलेंद्र अर्डक, गजानन पवार, सुधीर चर्जन, ताहेर अली, पंकज गाडे, उल्हास टवलारे, सचिन भोयर, प्रशांत मोहोड, गोपाल सोळंखे, मयूर बोरेकर, राहूल चार्सल, उमेश भुजाडे यांनी फत्ते केली. यापुर्वी देखील डिसेंबर २० मध्ये १०० हून अधिक मोबाईल मुळ मालकांना परत करण्यात सायबर पोलिसांनी पुढाकार घेतला होता.
बाॅक्स
विश्वास परतला
मोबाईल चोरीला गेला, की तो मिळणारच नाही, अशी अनेकांची धारणा. त्यामुळे अनेकजण तक्रार नोंदवण्यासाठी पुढे येत नाहीत. मात्र शहअर पोलिसांनी अत्यंत तांत्रिक पध्दतीने चोरी वा गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध लावून, व त्यापुढे जाऊन ते मोबाईल मुळ मालकाला परत करण्यासाठी जो पुढाकार घेतला आहे, त्या ‘सोशल पोलिसिंग’मुळे हरविलेला मोबाईल परत मिळू शकतो, असा विश्वास परतल्याची प्रतिक्रिया एका मोबाईलधारकाने उपस्थित कार्यक्रमादरम्यान दिली.
—————————