लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : वरूड-अमरावती मार्गावरून कन्हान वाळूने भरलेले शेकडो ओव्हरलोड ट्रक शहरामध्ये शिरत आहेत. निर्धोकपणे होणाऱ्या या अवैध वाहतुकीकडे पोलीस व महसूल या दोन्ही यंत्रणांनी सोईस्कर दुर्लक्ष चालविले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने जसे तालुक्यातील गुटखा तस्करांचे कंबरडे मोडले, त्या धर्तीवर पोलिसांनी महसूल यंत्रणेला सोबत घेऊन कारवाई करावी, अशी अपेक्षा मोर्शीकर व्यक्त करू लागले आहेत.सुसाट धावणाऱ्या वाहनांमुळे मोठे अपघात झाल्याची नोंद आहे. अवैध वाळू वाहतुकीमुळे मोठे अपघात झाले आहेत. शहरात अलीकडे आठ ब्रासपेक्षा अधिक वाळू वाहून नेणाऱ्या ट्रकनी धुमाकूळ घातला आहे. या ट्रकमधून शहरामध्ये वाळू येत असल्याने गल्लीबोळातील नागरिकांचे नळ कनेक्शन, पाईप, वॉल कंपाऊंड, सर्व्हिस गल्ली असलेली नाली, सांडपाण्याचे पाईप तुटत असल्याची ओरड आहे. नागपूर जिल्ह्यातून कन्हान वाळूची अवैध वाहतूक महिनाभरापासून जोरात सुरू आहे. राष्ट्रीय महामार्गावरून शेकडो ट्रक वाहतूक होत असून, यावर महसूल प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.शासकीय कामावर अवैध रेती?शहरात कन्हान वाळूचे मोठे माफिया असून शासकीय कामावरसुद्धा ही विनापरवानगी वाळू वापरली जाते. दिवसा व रात्रीदेखील मोठे ट्रक शहरात खाली केले जातात. या प्रकाराला पोलीस व महसूलमधील काहींची मूकसंमती असल्याचे दिसून येत आहे.तालुक्यातील अवैध रेती उत्खनन व वाहनांवर महसूल विभागाने कारवाई आरंभली आहे. पोलीस प्रशासन व आरटीओंना निर्देश दिले आहेत. संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे.- सिद्धार्थ मोरेतहसीलदार, मोर्शी
शहरातून ओव्हरलोड वाळूच्या टिप्परची निर्धोक वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 5:00 AM
सुसाट धावणाऱ्या वाहनांमुळे मोठे अपघात झाल्याची नोंद आहे. अवैध वाळू वाहतुकीमुळे मोठे अपघात झाले आहेत. शहरात अलीकडे आठ ब्रासपेक्षा अधिक वाळू वाहून नेणाऱ्या ट्रकनी धुमाकूळ घातला आहे. या ट्रकमधून शहरामध्ये वाळू येत असल्याने गल्लीबोळातील नागरिकांचे नळ कनेक्शन, पाईप, वॉल कंपाऊंड, सर्व्हिस गल्ली असलेली नाली, सांडपाण्याचे पाईप तुटत असल्याची ओरड आहे. नागपूर जिल्ह्यातून कन्हान वाळूची अवैध वाहतूक महिनाभरापासून जोरात सुरू आहे.
ठळक मुद्देमध्यरात्रीला शहरात दाखल : आठ ब्रासपेक्षा अधिक वजनाचा वाळूचा टिप्पर