लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गोवंशाच्या मांसाच्या विदेशात होणाऱ्या तस्करीचे अमरावती हे मुख्य केंद्र असल्याच्या निष्कर्षाप्रत बडनेरा पोलिसांचा तपास आला आहे. गोवंशाचे तब्बल ११ हजार किलो मांस प्रकरणाच्या तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी उघड होत आहेत. राज्यात गोवंश मांसविक्रीला बंदी असली तरी अमरावती शहरातील अवैध कत्तलखान्यांतून मुंबई मार्गे विदेशात मांस जाते. बडनेरा पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत चार जण ताब्यात घेतले आहे.पोलीस सूत्रानुसार, जुना अकोला टोलनाक्याजवळ गोवंश मांस घेऊन निघालेला एम.एच. ०४ एफएफक्यू ९४०० क्रमांकाचा ट्रक २२ डिसेंबर रोजी रात्री बडनेरा पोलिसांनी जप्त केला. ट्रकचालक शहजाद खान रहीम खान (२१, रा. लालखडी) व सैयद अजहर अली सै.गुलाम अली (२०, रा. अकबरनगर) यांना अटक करण्यात आली. रविवारी रात्री पोलिसांनी एजाज मुमताज चौधरी (४०, रा.गवळीपुरा) व मकसूद अहमद शे. गनी (४०, रा. रतनगंज) या दोघांना अटक केली. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. दोघांनाही २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. गोवंशाचे मांस व्हीएमव्ही नजीकच्या एका अवैध कत्तलखान्यातील असल्याची कबुली आरोपींनी दिली. शहरात गोवंशाची कत्तल मोठ्या प्रमाणात होत असल्याचे या कारवाईने स्पष्ट केले आहे. नागपुरी गेट व गाडगेनगर हद्दीत गोवंश कत्तलीचे अवैध कारखाने आहे. या गंभीर बाबीकडे पोलीस आयुक्त लक्ष देतील काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.मांस नष्ट करण्यासाठी मागितली परवानगीबडनेरा पोलिसांनी गोवंश मांसाने भरलेला ट्रक जप्त केला. त्यात तब्बल २० लाखांचे ११ टन मांस असल्याचे आढळून आले. आता या मासांची विल्हेवाट लावण्यासाठी बडनेरा पोलिसांनी न्यायालयात परवानगी मागितली आहे. न्यायालयीन परवानगीनंतर ते मांस नष्ट केले जाईल.उशिरापर्यंत सुरु होते न्यायालयगोवंश मांस वाहतूकप्रकरणी आरोपींना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. रविवारी रात्री ८ व सोमवारी सायंकाळीसुद्धा मांस नष्ट करण्यासंदर्भात परवानगी मिळण्यासाठी न्यायालयीन कामकाज सुरू होते. अखेर त्या दोघांना २५ डिसेंबरपर्यंतची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली.
गोवंश मांसाची विदेशात तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 10:29 PM
गोवंशाच्या मांसाच्या विदेशात होणाऱ्या तस्करीचे अमरावती हे मुख्य केंद्र असल्याच्या निष्कर्षाप्रत बडनेरा पोलिसांचा तपास आला आहे. गोवंशाचे तब्बल ११ हजार किलो मांस प्रकरणाच्या तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी उघड होत आहेत. राज्यात गोवंश मांसविक्रीला बंदी असली तरी अमरावती शहरातील अवैध कत्तलखान्यांतून मुंबई मार्गे विदेशात मांस जाते. बडनेरा पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत चार जण ताब्यात घेतले आहे.
ठळक मुद्देअमरावती मुख्य केंद्र : व्हीएमव्हीनजीक कत्तलखान्यातून रवानगी; बडनेरा पोलिसांकडून माहिती उघड