शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

मेळघाटातील नदी-नाल्यांमधून खुलेआम रेतीची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 11:16 PM

मेळघाटातील नदी-नाले रेती तस्करांच्या रडारवर असून, दररोज मध्यरात्री व भल्या पहाटे चोरीच्या रेतीचे ट्रॅक्टर शहर व गावाकडे वाहतूक करताना दिसून येत आहेत.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : लिलावापूर्वीच रेतीघाट होताहेत रिकामे

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : मेळघाटातील नदी-नाले रेती तस्करांच्या रडारवर असून, दररोज मध्यरात्री व भल्या पहाटे चोरीच्या रेतीचे ट्रॅक्टर शहर व गावाकडे वाहतूक करताना दिसून येत आहेत. रेती लिलावाची मुदत संपली असली तरी नवीन हर्रासाची प्रक्रिया सुरू न झाल्याने तस्करांचे चांगलेच फावले आहे.तालुक्यात तापी, गडगा, सिपना, खंडू, खापरा या प्रमुख नद्या व मोठ्या नाल्यात अल्प प्रमाणात रेतीसाठा उपलब्ध आहे. यापैकी दरवर्षी तापी नदीवरील दोन-तीन घाटांचीच लिलाव प्रक्रिया करण्यात येते. रेती तस्करांना इतर नदी-नाले आपल्या व्यवसायासाठी मोकळे सोडण्यात आले असल्यानेच गावाजवळून वाहणाºया नदी-नाल्यांवरून रेती, डब्बर सर्रास चोरण्याचा प्रकार उघड्या डोळ्यांनी बघावयास मिळत आहे. यावर्षी पूर न आल्यामुळे रेतीचा साठा अल्प प्रमाणात उपलब्ध आहे. त्यांनाही रिकामे करण्याचा विडाच रेती तस्करांनी उचलला आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार रात्री व भल्या पहाटे सुरू असल्याने याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.पाणीटंचाईचा धोका!तालुक्यातील धूळघाट येथील गडगा नदीवरील काठीयाघाट, सिपना नदीवरील उतावली, दिया तसेच इतर गावांजवळील नदी-नालेही रेती तस्करांनी साफ करणे सुरू केले आहे. याची वेळीच दखल घेतली नाही, तर भविष्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.आमच्या विभागाकडून तात्काळ कार्यवाही केली जाते. तरीही चोरटे सक्रिय असल्यास त्यासाठी लवकरच भरारी पथकाकडून कारवाई करण्यात येईल. प्रशासनाची रेती तस्करावर करडी नजर आहे.- संगमेश कोडे,तहसीलदार, धारणी.

टॅग्स :Melghatमेळघाट