शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

सोनसाखळीचोरांना रोखले अन् ते गतप्राण झाले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 11:05 PM

सोनसाखळी चोर येतात... एका महिलेच्या गळ्यातील साखळी ओढून नेतात... ती ओरडते... काही अंतरावर असलेल्या एका गृहस्थाला हे लक्षात येते... झटदिशी ते गृहस्थ चोरांच्या दिशेने झेपावतात... चोर दुचाकीवरून पडतात... चोर बचावासाठी त्या गृहस्थाच्या दिशेने चाकू रोखतात अन् त्या गृहस्थाला हृदयविकाराचा झटका येतो. ते जागीच गतप्राण होतात... चित्रपटात शोभावी, अशी ही गूढ घटना येथील चुनाभट्टीजवळील अंबादेवी रोडवर मंगळवारी सकाळी ६ वाजता घडली.

ठळक मुद्देअंबादेवी नाल्यावरील घटना : आरोपींनी रोखला चाकू

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सोनसाखळी चोर येतात... एका महिलेच्या गळ्यातील साखळी ओढून नेतात... ती ओरडते... काही अंतरावर असलेल्या एका गृहस्थाला हे लक्षात येते... झटदिशी ते गृहस्थ चोरांच्या दिशेने झेपावतात... चोर दुचाकीवरून पडतात... चोर बचावासाठी त्या गृहस्थाच्या दिशेने चाकू रोखतात अन् त्या गृहस्थाला हृदयविकाराचा झटका येतो. ते जागीच गतप्राण होतात... चित्रपटात शोभावी, अशी ही गूढ घटना येथील चुनाभट्टीजवळील अंबादेवी रोडवर मंगळवारी सकाळी ६ वाजता घडली. या घटनेची मोठी चर्चा त्या परिसरात आहे. पोलिसांचे मात्र याविषयी मत भिन्न आहे.नमुना गल्ली क्रमांक ४ येथील संध्या विजय शिंदे (५०) मंगळवारी सकाळी ६ वाजता श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाजवळील गौरक्षणात दूध घेण्यासाठी गेल्या. परत येताना अंबा नाल्याच्या पुलावर रुमाल बांधून दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी त्याच्या गळ्यावर हात टाकून १२ ग्र्र्र्र्रॅमची सोनसाखळी हिसकावून पळ काढला.चोरट्यांनी उगारला चाकूनाल्याजवळील ओट्यावर बसलेल्या प्रभाकर गोधनकर (५५, रा. नमुना) यांनी चोरांच्या दिशेने धाव घेतली. काही अंतरावर चोरट्यांची दुचाकी प्रभाकर गोधनकर यांनी रोखून घेतली असता, चोरांची दुचाकी घसरून खाली कोसळली. दुचाकीवर मागे बसलेल्या चोरांनी कमरेतील चाकू काढून प्रभाकर गोधनकर यांच्या दिशेने रोखला. चोरांनी त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच गोधनकर यांनी चोरांपासून सावध होण्याचा प्रयत्न केला. मात्र, धावत गेल्याने वयोवृद्ध प्रभाकर गोधनकर यांना धाप लागली. त्यातच चोरांनी चाकू उगारल्याचा धसका घेतल्याने प्रभाकर गोधनकर यांच्या छातीत तीव्र वेदना झाल्या. ते खाली कोसळले.यादरम्यान संध्या शिंदे यांनी या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. नमुना परिसरातील काही नागरिक व गोधनकर कुटुंबातील सदस्यदेखील घटनास्थळी धावून गेले. या कालावधीत चोरट्यांनीही पळ काढला.कुटुंबीयांनी तत्काळ प्रभाकर गोधनकर यांना खासगी रुग्णालयात नेले. तेथून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.सोनसाखळी चोरीच्या घटनेची तक्रार संध्या शिंदे यांनी राजापेठ पोलिसांकडे केली असून, त्यानुसार पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध भादंविच्या कलम ३९२ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.मंगळसूत्र हिसकले; महिला जखमीमंगळसूत्र हिसकावण्यात आल्यानंतर महिला खाली कोसळून जखमी झाल्याची घटना २४ जुलै रोजी हरिओम कॉलनीत घडली. या प्रकरणात हरिहर केशव केने यांनी मंगळवारी गाडगेनगर पोलिसांकडे तक्रार नोंदविली. काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी मंंगळसूत्र हिसकण्याचा प्रयत्न केला असता, ती महिला खाली कोसळली. जखमी अवस्थेत त्या महिलेस खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असल्यामुळे तक्रार उशिरा नोंदविण्यात आली. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे.दुचाकी क्रमांकाची प्लेट वाकलेलीसोनसाखळीचोरांच्या दुचाकीवरील क्रमांकाची प्लेट वाकलेली असल्याचे प्रत्यक्षदर्शींच्या निदर्शनास आले. त्यावर २४ असा क्रमांक काही जणांनी पाहिल्याचे स्थानिक रहिवासी सांगत होते.घटनास्थळावर सापडला एका चोराचा बूटसोनसाखळी चोरून पळणाऱ्यांना पकडण्यासाठी प्रभाकर गोधनकर धावून गेले. त्यांना चोराने गाडीवर बसूनच लाथा झाडल्या. यादरम्यान दुचाकीवर मागे बसलेल्या चोराचा बूट पायातून निघाला आणि दुचाकी घसरली. या घाईत चोराने एक बूट सोडून तेथून पलायन केले. घटनेच्या काही वेळानंतर राजापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, त्यांना रस्त्यावर पडलेला बूट आढळून आला.मंगळसूत्र हिसकाविल्यानंतर वळण रस्त्यावर चोरटे दुचाकीवरून पडले. त्याच वेळी नमुन्यातील एक गृहस्थ चोरीच्या घटनेच्या अनुषंगाने पाहण्यासाठी धावत गेले अन् हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले.- किशोर सूर्यवंशी,पोलीस निरीक्षक, राजापेठ.