शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
2
“आमच्या नादी लागू नका, मर्द होता मग पळून कशाला गेला?”; थोरातांचा सुजय विखेंना सवाल
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात राजकीय घडामोडींना वेग! उत्तर विधानसभेतील उमेदवारीवरुन माजी नगरसेवकांची नाराजी, वाड्यावर बैठक सुरु
4
"कधी न चालणारा माणूस..."; अमित ठाकरेंच्या दाव्यावर सदा सरवणकरांचा खोचक टोला
5
पुण्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व पणाला; दोन्ही पवारांचे पक्ष किती जागांवर लढवतायत निवडणूक?
6
अभिनेत्रीचा पती होण्यापेक्षा नवाब मलिकांची मुलगी होणे केव्हाही चांगले; सना मलिकांनी स्वरा भास्करला सुनावले
7
वडील मजूर, बहिणीच्या लग्नानंतर कर्जाचा डोंगर; शाळेबाहेर भुईमुगाच्या शेंगा विकते विद्यार्थिनी
8
अखेर भाजपला उमेदवार मिळाला, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'हा' नेता मैदानात...
9
महिलांसाठी विशेष स्कीम, गुंतवणूकीवर मिळतोय जबरदस्त रिटर्न; पाहा संपूर्ण डिटेल 
10
माझी बायको हिरोईन नाही म्हणून तिकिट मिळालं नसावं; शरद पवार गटातील इच्छुकाची खंत
11
"... अन्यथा बाहेर पडणं कठीण होईल," का धोनीनं तरुणांना दिला F&O पासून दूर राहण्याचा सल्ला?
12
सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम, म्हणाले, "मी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आणि विजयी होणार’’
13
क्रिकेटमध्ये नाही काडीचा रस; तरी या मुद्यावरून साक्षीनं घातली MS धोनीशी हुज्जत
14
'हे' आहेत देशातील सर्वात महागडे १० शेअर्स; किंमत आणि रिटर्न ऐकून अवाक् व्हाल; तुमच्याकडे आहे?
15
"ती माझ्याशी लग्न करत नव्हती आणि मलाही..."; जिम ट्रेनरने सांगितली हत्येची Inside Story
16
कोण आहे सोफिया सीव्हिंग, जिने पहिलीवहिली पिकलबॉल स्पर्धा जिंकून रचला इतिहास (Photos)
17
५० वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागल्याचे २३ तारखेला समजले पाहिजे; विखेंविरोधात लंकेंचा एल्गार
18
झारखंड: हेमंत सोरेन यांच्याविरोधात भाजपाने उमेदवार उतरविला; २०१९ ला होती केवळ २५०० मते
19
Sharmila Thackeray : "लोकांनी आता ठरवायचंय, त्यांना पैसे हवेत की..."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
20
"...तर माझी कधीही हत्या होऊ शकते’’, लॉरेन्स गँगच्या धमकीनंतर पप्पू यादवांचं गृहमंत्रालयाला पत्र 

-तर ‘महेफिल’वर जप्ती

By admin | Published: September 05, 2015 12:20 AM

स्थानिक कॅम्प परिसरातील हॉटेल महेफिल, ग्रँड महेफिलच्या नियमबाह्य व अतिरिक्त बांधकाम प्रकरणी आयुक्तांनी अपीलवर सुनावणी करताना दंडात्मक कर भरण्याचे आदेश दिले होते.

नोटीस बजावली : वीज, पाणी बंद करण्याचा इशाराअमरावती : स्थानिक कॅम्प परिसरातील हॉटेल महेफिल, ग्रँड महेफिलच्या नियमबाह्य व अतिरिक्त बांधकाम प्रकरणी आयुक्तांनी अपीलवर सुनावणी करताना दंडात्मक कर भरण्याचे आदेश दिले होते. मात्र, प्रतिष्ठानच्या संचालकांनी प्रशासनाच्या आदेशांचे पालन केले नाही. त्यामुळे आयुक्तांच्या आदेशानुसार शुक्रवारी कर अदा करण्यासाठी पुन्हा या प्रतिष्ठानांना नोटीस बजावली असून पाच दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. ही नोटीस आयुक्तांच्या स्वाक्षरीने बजावण्यात आली आहे.आयुक्त गुडेवार यांनी प्रवीण मुंधडा व अमरनाथ बाळकृष्ण यांच्या नावे ‘महेफिल’ला शुक्रवारी बजावलेल्या नोटिशीत मालमत्ता करावरील कर आकारणीपोटी १,१३,३६,५१२ रुपये रक्कम सुनावणी दरम्यान निश्चित केली होती. अपिलाची सुनावणी करण्याकरिता मालमत्ताकर आकारणी रक्कमेच्या ५० टक्के म्हणजे ५६,६८,२५६ इतक्या रकमेचा सात दिवसांच्या आत भरणा करणे अपेक्षित होते. मात्र, मुदतीच्या आत ही रक्कम भरण्यात आली नाही. त्यामुळे महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ मधील प्रकरण ८ चे नियम ४२ ते ४९ नुसार जप्तीची नोटीस या प्रतिष्ठानांना बजावण्यात आली आहे. या मालमत्तेवर सहायक आयुक्त झोन क्र. १ यांनी ९,७३,६८६ इतकरी कर आकारणी सुनावणी दरम्यान केली होती. या रकमेच्या ७५ टक्के ७,३०,२६४ रक्कम आठवड्याच्या आत भरणे अपेक्षित होते. मात्र, ती मुदतीच्या आत भरण्यात आली नाही. परिणामी जप्तीची नोटीस बजावली आहे. अन्य एका मालमत्तेवर १३,७१,५७६ रूपयांची कर आकारणी करण्यात आली होती. मात्र, ‘महेफिल’च्या संचालकांनी दीड कोटींपैकी कराचा एकही छदाम भरला नाही. त्यामुळे आयुक्तांनी कराची रक्कम भरण्यासाठी पाच दिवसांचा अवधी दिला आहे. ही रक्कम न भरल्यास त्यानंतर चल संपत्तीवर कारवाईची प्रक्रिया राबविली जाणार आहे. यावेळी सुध्दा कराची रक्कम न भरल्यास संपत्तीचा लिलाव करण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत. अन्यथा पोलीस बंदोबस्तात ही मालमत्ता ताब्यात घेता येईल, असे महापालिका अधिनियमात नमूद आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)या अधिनियमानुसार बजावल्या नोटिशीमहाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ चे कलम ४०६ (२) (ई), ४०६ (८) अन्वये मालमत्ता करवसुलीची नोटीस बजावण्यात आली आहे. या कलमान्वये आयुक्तांना संबंधित प्रतिष्ठानचा जप्तीनामा, वीज व पाणी पुरवठा बंद करण्याचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत. लिलावानंतर ही मालमत्ता ताब्यात घेण्याचे अधिकार देखील आयुक्तांना आहेत. ‘महेफिल’ला जप्तीची नोटीस बजावल्याने पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले आहे.उर्वरित मालमत्ताही रडारवरविनापरवानगी आणि अतिरिक्त बांधकामाप्रकरणी शहरातील प्रतिष्ठानांना यापूर्वी नोटीस बजावल्या आहेत. मात्र, या मालमत्ताधारकांनी कराची रक्कम भरली नाही, अशा आठ ते १० मालमत्तांवर जप्ती आणली जाणार आहे.