अमरावती : दिवसाढवळ्या घरफोड्या करणाऱ्या किशोर तेजराव वायाळ (३५, रा. मेरा बु., ता. चिखली, जि. बुलडाणा) याच्याकडून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह आणखी ३२४ ग्रॅमचे सोने बुधवारी जप्त केले. वायाळने आतापर्यंत नऊ घरफोड्यांची कबुली दिली असून, या गुन्ह्यात पोलिसांनी २९ लाख ६ हजार १०० रुपयांचे ९३१ ग्रॅम सोने जप्त केले आहे. आरोपी वायाळला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी असून, त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.अमरावतीत भरदिवसा घर व फ्लॅट फोडणारा कुख्यात किशोर वायाळ याने पहिले पाच घरफोड्यांची कबुली पोलिसांना दिली होती. या गुन्ह्यातील ६०४ ग्रॅमचा सोन्याचा मुद्देमाल पोलिसांनी बुलडाण्यातील मेरा (बु.) येथील सुवर्णकारांकडून जप्त केला. ही धडाकेबाज कारवाई पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक व पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राम गिते, पोलीस हवालदार प्रेम वानखडे, विनय मोहोड, पोलीस नाईक अमर बघेल, अजय मिश्रा, दिनेश नांदे, राजू आप्पा, पोलीस शिपाई सुलतान, इमरान, संग्राम भोजने, विनोद गाडेकर, चालक अमोल व रौराळे यांनी केली. आरोपी किशोर वायाळला १२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. दरम्यान, पोलीस चौकशीत किशोरने बडनेरा, नांदगावपेठ, गाडगेनगर व फे्रजरपुरा हद्दीतील चार घरफोड्यांची कबुली दिली. या चार गुन्ह्यांतील १० लाख ४ हजार ४०० रुपयांचे ३२४ ग्रॅमचे सोने पीएसआय राम गीतेंच्या पथकाने मेरा (बु.) येथून जप्त केला आहे.यांच्या घरातून चोरी गेला होता मुद्देमालआरोपी किशोर व त्याच्या साथीदाराने शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या केल्या. त्यामध्ये सुजय रावसाहेब बंड (रा. अर्जुननगर), विजय माधव हाडोळे (रा. बडनेरा), शीतल हरणे (रा. गांधीनगर), सुरेखा पडोळे (रा. मोतीनगर), हरिकृष्ण दिवे (रा. भारतनगर), वर्षा वानखडे (रा. रहाटगाव), रोशन झामरे (रा. अर्जुननगर), गजानन बाकडे (रा. अशोकनगर) व प्रकाश तिडके (रा. अश्विनी कॉलनी) यांची घरे आरोपींनी लक्ष्य करून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. तो मुद्देमाल पोलिसांनी आरोपींकडून जप्त केला.किशोरच्या साथीदाराला शोध सुरूघरात कोणी नसल्याचे न्याहाळून आरोपी किशोर व त्याचा साथीदार लहू दगडू धंदरे (रा. रोहणा, जि. बुलडाणा) हे दोघेही घरफोड्या करीत होते. बुलडाण्यावरून दुचाकीने अमरावतीत येऊन हे चोरी करायचे. विविध शहरांना लक्ष्य करून ते घरफोडी करून पसार होत होते.
आंतरराज्यीय महाचोराकडून आतापर्यंत एक किलोचे सोने जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 7:38 PM