शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

- तर आई-बहिणींची सुरक्षितता धोक्यात होती

By admin | Published: April 22, 2017 12:18 AM

झोपडपट्टीतील गरीब, दलित, सामान्य कुटुंबांतील आई- बहिणींची सुरक्षितता कुख्यात गुंड अशोक गजभिये ऊर्फ खांडेरावमुळे धोक्यात आली होती.

आरोपींचे बयाण : २० वर्षांपासून दहशतीत होते नागरिक बडनेरा : झोपडपट्टीतील गरीब, दलित, सामान्य कुटुंबांतील आई- बहिणींची सुरक्षितता कुख्यात गुंड अशोक गजभिये ऊर्फ खांडेरावमुळे धोक्यात आली होती. यामुळेच हताश होऊन एकजुटीने त्याचा खात्मा करावा लागला, असे बयाण खुनाच्या आरोपात अटक केलेल्या दोन्ही आरोपींनी पोलिसांना दिले आहे. बडनेऱ्यातील नवीवस्ती स्थित पंचशीलनगरात ‘खांडेराव’ हा रात्री-अपरात्री महिला, मुलींची छेड काढायचा. भीतीपोटी किंवा बदनामी होईल, या कारणास्तव अनेक मुलींच्या अत्याचाराच्या घटना समोर आल्या नाहीत. अल्पवयीन मुलींमध्ये त्याची प्रचंड दहशत होती. परिणामी ‘खांडेराव’ याची विकृत प्रवृत्ती संपविणे हाच एक मार्ग होता, असे आरोपींनी बयाणात म्हटले आहे. त्याचा खात्मा केला म्हणून नव्हे तर अशोक याचेवर बडनेरा पोलीस ठाण्यात यापूर्वी बलात्कार, विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत, हे देखील अटकेतील आरोपी हिरामन रोकडे, संतोष पकिड्डे यांनी बयाणात नमूद केले आहे. २० वर्षांपासून अशोकच्या गुंड प्रवृत्तीने नागरिक त्रस्त झाले होते. अनेकदा पोलिसात तक्रार नोंदविली. मात्र अपुऱ्या साक्ष पुराव्या अभावी त्याची न्यायालयातून सुटका झाली. कठोर शिक्षा होत नसल्याने अशोकची विकृत प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढतच चालेली होती. त्यामुळे तो नागरिकांवर वचक ठेवून होता. सामूहिक गुन्हा दाखल करावा बडनेरा : अवैध व्यावसायिकांकडून हप्ता वसुली, दारू विक्रेत्यांवर रुबाब टाकून फुकटात मद्यप्राशन तसेच महिलांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे, अल्पवयीन मुलींवर वाईट नजर ठेवणे हा त्याचा शिरस्ता होता. त्यामुळेच अशोकची हत्या झाल्यानंतर त्याच दिवशी पंचशीनगरातील महिला, पुरुषांनी पोलीस ठाणे गाठून सामूहिकपणे गुन्हे दाखल करा, अशी पोलिसांना मागणी केली होती. अशोक याचेवर आतापर्यंत दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये चार विनयभंगाचे गुन्हे दाखल असल्याची पोलीस दत्फरी नोंद आहे. विशेषत: अल्पवयीन मुलींच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळेच कुख्यात गुंड ‘खांडेराव’ याचा खात्मा करण्यात आला. अशोकच्या हत्येप्रकरणातील आरोपी हिरामन रोकडे याने मुलगी आणि पत्नीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळेच वडिल आणि पतीचे एकाच वेळी कर्तव्य निभावल्याची भावना पोलिसांकडे व्यक्त केली. (शहर प्रतिनिधी)