जरूड..
प्रशांत काळबेंडे
करोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी झालेले मृत्यू पाहून ,अमरावती जिल्ह्यात सर्वात जास्त कॅरोना रुग्णाचे प्रमाण वरूड तालुक्यात असल्याने आपल्या मतदार संघातील वरूड तालुक्यात ऑक्सिजन प्लांट असावा या उद्देशाने आ. देवेंद्र भुयार यांनी आमदार फंडातून 58 लक्ष 68 हजार रुपयाची तरतूद केलेला ऑक्सिजन प्लांट नेमका कुठे आहे याचा शोध तालुक्यातील जनता घेत आहे.
दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी आरोग्य यंत्रणेचे निघत असताना महाराष्ट्रातील मृत्युदर हा देशात सर्वात जास्त असल्याने येणाऱ्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेवून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील 260 तालुक्यात ऑक्सिजन प्लांट उभारण्याची घोषणा केली होती त्यानुसार आ देवेंद्र भुयार यांनी जिल्हाधकाऱ्यांना 58 लक्ष 68 हजार रुपयाची तरतूद वरूड तालुक्यातील बेनोडा येथील रुग्णालयात दररोज 44 सिलेंडर भरता येईल असा हवेतून ऑक्सिजन निर्मिति प्लांट उभारण्यासाठी जिल्हा आरोग्यअधिकारी यांचे सही निशी नागपूर येथील कंपनीला काम करण्याचे आदेश पत्र दिल्या गेले होते.
दुसरी लाट ओसरल्यानंतर तिसऱ्या लाटीचा अंदाज व्यक्त होत असताना अजून पर्यंत ऑक्सिजन प्लांट चे कोणतेही काम सुरू न झाल्याने तालुक्यातील जनतेला हा प्लांट नेमका तयार होणार की नाही.हा प्रश्न उपस्थित होत असताना .आरोग्य यंत्रणेतील अधिकारी या ऑक्सिजन प्लांट विषयी बोलण्यास तयार नसल्याने साशंकता व्यक्त केल्या जात असून नीच्चिताच वरूड तालुक्यात ऑक्सिजन निर्मिती प्लांट तयार होणार की नाही यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.