अमरावती : ग्रामीण भागाशी संबंधित असलेल्या जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला गत सहा वर्षांपासून नियमित अधिकारी नसल्यामुळे या विभागाचा कारभार अद्यापही प्रभारी अधिकाऱ्यांवर सुरू आहे. विशेष म्हणजे, गत सहा वर्षात सहा अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे या विभागाला वाली नसल्याचे चित्र असून या ठिकाणी नियमित अधिकारी केव्हा मिळणार, हा खरा प्रश्न आहे.
समाजकल्याण विभागामार्फत विविध महत्त्वाच्या योजना राबविल्या जातात. या योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यावर आहे. मात्र, दोन वर्षांपासून या विभागाला नियमित अधिकारी मिळालेला नाही. आतापर्यंत सहा प्रभारी अधिकारी या ठिकाणी नियुक्त करण्यात आले होते. त्यांनाही आता अन्यत्र नियुक्ती देण्यात आल्याने समाजकल्याण विभागाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवरच चालू आहे.
बॉक्स
यांनी सांभाळली अतिरिक्त धुरा
मीना अंबाडेकर - २१ जून २०१७ ते २८ जून २०१८
चेतन जाधव - २८ जून ते २६ नोव्हेंबर २०१८
प्रशांत थोरात - २६ नोव्हेंबर २०१८ ते २३ जानेवारी २०१९
अमोल यावलीकर - २३ जानेवारी ते १७ जून २०१९
दीपा हेरोडे - १० जून २०२० ते ३ फेब्रुवारी २०२१
राजेंद्र जाधवर - ६ मे पासून अद्याप
कोट
समाजकल्याण विभागाला नियमित अधिकारी नियुक्त करावा, याकरिता अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सभापती म्हणून शासनाकडे पद भरण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे आणि करीत आहोत.
- दयाराम काळे, सभापती, समाजकल्याण समिती, जिल्हा परिषद