लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात मुरुमाऐवजी मातीचा अतिवापर केला जात आहे. वापरण्यात येणारी पिवळी माती ही रंगाने पिवळी असून, ती बांधकामासाठी उपयोगी नाही, असे स्थनिक नागरिकांचे मत आहे. माती चोपण असल्यामुळे मुरुमाला पर्याय ठरू शकत नाही. तरीही काँक्रीट रस्त्याच्या बांधकामात मुरूमाऐवजी मातीचा वापर का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.सदर महामार्गावरील बहुतांश जमीन काळी व चोपण असल्याने येथील डांबरी रस्ते वारंवार खराब होण्याचा आजवरचा अनुभव बांधकाम विभागाच्या पाठीशी आहे. तरीदेखील हीच पिवळी चोपण माती रस्त्याच्या बांधकामासाठी वापरण्याचे प्रयोजन का, हेच सामान्य नागरिकांना कळेनासे झाले आहे. महामार्गाचे बांधकाम पक्के होण्यासाठी बांधकामात मुरुमाचा वापर करणेच योग्य आहे. तालुक्यात मुरुम मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतानाही बांधकामासाठी पिवळी माती वापरण्यास एचजी इन्फ्रा कंपनी आग्रही का? याकडे संबंधित विभागाच्या शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष का, हे न सुटणारे कोडेच आहे.रस्त्याचा बांधकामासाठी वापरण्यात येणाºया चोपण मातीचा विशेष गुण म्हणजे या मातीत ओलावा असेपर्यंतच घट्ट पकड ठेवणारी ही माती आहे. कोरडेपणा सुरू होताच ही माती धसल्या सुरुवात होऊन धुळीत परिवर्तीत होण्याचा या मातीचा विशेष गुणधर्म आहे. यामुळेच परिसरातील शेतकरी आपल्या शेतात विहीर खोदण्यासही पुढे येत नाही. ही माती रस्त्यावरील वाहनांचे वजन सांभाळणार कशी? रस्त्याचा बांधकामासाठी जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग कंत्राटदारांना मुरुमाचाच अधिक वापर करायला लावतात. मग हा नियम महामार्गाच्या बांधकामात का लागू होत नाही, असा प्रश्नदेखील उपस्थित केला जात आहे.तालुक्यातील पिवळी माती ही निष्क्रिय चोपण माती असल्याने ती रस्ता बांधकामासाठी वापरणे अयोग्य आहे. या मातीचे धुळीत रूपांतर होते. त्याचा नागरिकांना त्रास होतो.- विनोद जवंजाळ,संचालक, कृषिउत्पन्न बाजारसदर माती बांधकामात उपयुक्त असल्याचे प्रमाणपत्र संबंधित माती परीक्षण विभागाने दिल्यामुळेच ही माती रस्त्याच्या बांधकामात वापरली जात आहे- ऋषिकेश हजारे,उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागचोपण मातीत काँक्रीटच्या विहिरीही खचत असल्याचा अनुभव तालुक्यातील शेतकºयांचा पाठीशी आहे. मग या मातीवरील काँक्रीटचा रास्ता कायमस्वरूपी कसा टिकेल?- मदन देशमुख, शेतकरी
काँक्रीट रस्त्यावर मुरूमऐवजी माती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 11:28 PM
तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात मुरुमाऐवजी मातीचा अतिवापर केला जात आहे. वापरण्यात येणारी पिवळी माती ही रंगाने पिवळी असून, ती बांधकामासाठी उपयोगी नाही, असे स्थनिक नागरिकांचे मत आहे.
ठळक मुद्देबांधकामाचा दर्जा खालावला : नागरिकांकडून उपस्थित होतोय प्रश्न