शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

पाण्याची वाफ बनविणारा सोलर एनर्जी कॉन्सन्ट्रेटर; अमरावतीमधील निवृत्त विभागप्रमुखांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 10:32 AM

राष्ट्रसंत कॉलनी येथील रहिवासी आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे निवृत्त भौतिकशास्त्र विभागप्रमुख बी.एच. पवार यांनी सोलर एनर्जी कॉन्सन्ट्रेटर बनवले आहे.

ठळक मुद्देजैविक इंधनाचा भार होईल कमी औद्योगिक वापरासाठी इंधनाचा नवा पर्याय

धीरेंद्र चाकोलकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राष्ट्रसंत कॉलनी येथील रहिवासी आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे निवृत्त भौतिकशास्त्र विभागप्रमुख बी.एच. पवार यांनी सोलर एनर्जी कॉन्सन्ट्रेटर बनवले आहे. यामध्ये सौरऊर्जेचा वापर करून पाण्याची वाफ बनवण्यापर्यंतचे तापमान सौर ऊर्जा प्लेटची रचना बदलून तयार करण्यात आले आहे. या वाफेचा वापर स्वयंपाकात थेट कूकरमध्ये करण्याचा आणि त्याद्वारे जैविक इंधनाचा भार कमी करण्याचा मनोदय पवार यांनी व्यक्त केला आहे. या वाफेचा वापर करून औद्योगिक क्षेत्रात रिएक्टरसाठी करून पारंपारिक विजेवर भार कमी करण्याचे या प्रयोगाचे उद्दिष्ट आहे.या सेमी सिलेंड्रिकल आकाराच्या रिफ्लेक्टरच्या तळाशी स्टेनलेस स्टीलचे काळा रंग लावलेले पाईप जोडले आहेत. त्यातून सिलेंडरमध्ये एका बाजूने आणलेले पाणी सौरऊर्जेद्वारे तापून दुसऱ्या बाजूला त्याची वाफ बाहेर पडते. साधारणपणे १०० अंश डिग्री सेल्सिअस तापमानात पाण्याची वाफ होते. तेवढे तापमान या सोलर एनर्जी कॉन्सन्ट्रेटरमध्ये जनरेट करायची किमया पवार यांनी केली आहे.एवढेच नव्हे तर जनरेटरला शक्ती पुरविण्यासाठी याद्वारे तयार झालेली वाफ वापरली जाऊ शकते. याशिवाय वाफेचा वापर अन्न शिजविण्यासाठी तसेच विशिष्ट तव्याचा वापर करून पोळ्या भाजण्याच्या कामातदेखील होऊ शकतो. त्यामुळे देशातील कोट्यवधी रुपयांच्या इंधनाचा प्रश्न सुटेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे.इंस्युलेटरचा वापर करून प्लेटखालील तापमान नियंत्रित करून उष्माघाताच्या रुग्णांसाठी दिलासादायक वातावरण तयार करता येईल, अशी संकल्पनादेखील पवार यांनी मांडली. हे उपकरण मेडासह सर्व शासकीय विभागांना सादर करून तांत्रिक मंजुरी मिळविण्याच्या हालचाली पवार यांनी केल्या आहेत. या तांत्रिक कार्यात त्यांना मुलगा अभिजित पवार यांनी सहकार्य केले. उपकरणात आणखी सुधारणा करण्यासाठी त्यांचे प्रयोग सुरू आहेत.

स्टेनलेस स्टील पत्र्याचा तयार केला कॉन्केव्ह मिररबी.एच. पवार यांनी या उपकरणासाठी ४ बाय २ फुटाच्या स्टेनलेस स्टील पत्र्याचा कॉन्केव्ह मिरर तयार केला. त्यावर ५० बाय १६ इंचाची काच बसविली आणि त्याखालून एक इंच व्यासाचे स्टेनलेस स्टील पाईप काढले आहेत. हे उपकरण पाणी शुद्धीकरण, डिस्टिल्ड वॉटर प्लांटमध्ये वापरले जाऊ शकते.

सेमी सिलेंड्रिकल आकाराचे रिफ्लेक्टर वापरलेसौर ऊर्जा प्लेटची रचना साधारणपणे आयताकृती वा चौकोनी असते. त्यामुळे त्यावर पडणारा सूर्यप्रकाश बहुतांश रिफ्लेक्ट होतो. त्यामुळे सौर ऊर्जा बहुतांश कमी धारण केली जाते.ही अडचण लक्षात घेऊन पवार यांनी सेमी सिलेंड्रिकल आकाराचे रिफ्लेक्टर वापरले आहे. वक्र आकाराच्या रिफ्लेक्टरमुळे सौर ऊर्जा पूर्णपणे आत शोषली जाते.

टॅग्स :scienceविज्ञान