शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

सौर पथदिव्यांत गोलमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 1:22 AM

जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत सन २०१३-१४ आणि २०१४-१५ मध्ये जिल्हाभरातील ग्रामपंचायत क्षेत्रातील दलितवस्त्यांमध्ये सौर पथदिवे लावण्यात आले होते. याबाबत माहिती देण्याची मागणी आरोग्य व वित्त समितीचे सभापती बळवंत वानखडे यांनी स्थायी समिती सभेत केली होती.

ठळक मुद्देजि.प.स्थायीत मुद्दा गाजला : सदस्यांनी विचारला जाब

ऑनलाईन लोकमतअमरावती : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत सन २०१३-१४ आणि २०१४-१५ मध्ये जिल्हाभरातील ग्रामपंचायत क्षेत्रातील दलितवस्त्यांमध्ये सौर पथदिवे लावण्यात आले होते. याबाबत माहिती देण्याची मागणी आरोग्य व वित्त समितीचे सभापती बळवंत वानखडे यांनी स्थायी समिती सभेत केली होती. यावर १५ मार्च रोजी अनुपालन अहवालात दिलेली माहिती ही संभ्रम निर्माण करणारी असल्याने झेडपी सदस्य व पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले होते.जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा विविध विषयांना अनुसरून अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. सभेला उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, वनिता पाल, सुशीला कुकडे, सीईओ मनीषा खत्री, काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख, विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे, सदस्य महेंद्रसिंह गैलवार, बाळासाहेब हिंगणीकर, सुहासिनी ढेपे, सुनील डिके, प्रियंका दगडकर, अभिजित बोके, अतिरिक्त सीईओ विनय ठमके, कॅफो रवींद्र येवले, डेप्युटी सीईओ कैलास घोडके, प्रकल्प संचालक के.एम. अहमद व खातेप्रमुख उपस्थित होते.यावेळी मागील सभेत सर्व बीडीओंनी अमरावती : समाजकल्याण विभागाने सौरदिवे लावण्याबाबतची माहिती नसल्याचे सभागृहात सांगितले होते. त्यानुसार याप्रकरणी माहिती घेऊन त्याचा अहवाल आजच्या सभेत ठेवण्यात आला. मात्र, बीडीओ व समाजकल्याण विभाग तसेच पंचायत विभागाने अनुपालनात दिलेली सर्व माहिती ही गोलगोल असल्याने सदस्य संतापले. यामुळे सभागृहाचे वातावरण तापले होते. अखेर सीईओ मनीषा खत्री यांनी याबाबत चौकशी समिती नेमून पुढील सभेत यावर माहिती देण्याचे मान्य केले. त्यामुळे हा मुद्दा निवळला.चांदूर बाजार तालुक्यातील टाकरखेड पूर्णा येथील ग्रामसेवक उईके यांनी शासकीय निधीत घोळ केल्याबाबत बीडीओंकडे तक्रारीचे काय झाले, याचा जाब बबलू देशमुख यांनी विचारला. चांदूर बाजारचे बीडीओ विशाल शिंदे यांनी संबंधित ग्रामसेवकाला निलंबित केले आहे. त्यांच्याकडील पदभार हा अकोलकर नामक ग्रामसेवकाला सोपविला आहे. मात्र, त्यांना पदभार सोपविण्यास उईके हे टाळाटाळ करीत असल्याने त्यांना तीन कारणे दाखवा नोटीस बजावल्यात. त्यानंतर त्यांनी आता पदभार सोपविला आहे. यानुसार दस्तावेजाची तपासणी करून पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन सभागृहाला मिळाले. नांदगाव तालुक्यातील अडगाव व मांजरी म्हसला येथील सिंचन विहीर घोळप्रकरणी दोषींवर कोणती कारवाई केली, असा मुद्दा सुहासिनी ढेपे यांनी मांडला. यावर वसुली करण्याचे संबंधित लाभार्थींना बजावल्याची माहिती बीडीओ पल्लवी वाडेकर यांनी दिली. यासोबतच दोषींवर कारवाई केल्याचेसुद्धा त्यांनी सभागृहात सांगितले.ग्रामीण भागातील गोरगरिबांना शासनाच्या विविध घरकुल योजनांतून लाभ दिला जातो. मात्र, अनेकांना घरकुलाचा हप्ता मिळाला नाही. पंडित दीनदयाल योजनेतून जागा खरेदीसाठी अनुदान मिळत नाही, सोबतच लाभार्थींचे प्रवर्गसुद्धा बदलले आहेत आदी मुद्द्यांवर बळवंत वानखडे, बबलू देशमुख, रवींद्र मुंदे, बाळासाहेब हिंगणीकर, सुहासिनी ढेपे, सुनील डिके, महेंद्रसिंह गैलवार यांनी प्रश्नांचा भडिमार केला. यावर प्रकल्प संचालक के.एम. अहमद यांनी प्रशासनाची बाजू मांडली. घरकुलांचे काम योग्य व नियमानुसार चालू असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.