शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

अभियांत्रिकीच्या मृणालने बनविली ‘सोलर’ची तीनचाकी सायकल

By admin | Published: March 30, 2015 12:03 AM

आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची. पण, जिद्द मात्र काही तरी वेगळे करून दाखविण्याची.

नितीन टाले कावली (वसाड)आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची. पण, जिद्द मात्र काही तरी वेगळे करून दाखविण्याची. याच जिद्दीने ती कावलीसारख्या अत्यंत लहान गावातून विद्यानगरी धामणगावात शिक्षणाकरिता आली आणि मेकॅनिकल अभियंत्याचे शिक्षण घेत असतानाच तिने कल्पकतेचा वापर करून सोलरवरील आगळी-वेगळी सायकल तयार केली. ती या सायकलनेच महाविद्यालयात जाते. लोक तिच्याकडे आश्चर्याने बघतात. तिची ही आगळी निर्मिती अपंगांसाठी फारच फायदेशिर ठरणार आहे. ही यशोगाथा आहे कावली वसाड येथील मृणाल मारोतराव साळवण हिची. तब्बल चार महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर तिच्या पदरी हे यश पडले आहे. पारंपारिक लोहार कुटुंबातून आलेली मृणाल हे यश ऐरणीच्या देवाला अर्पण करते. सोलरवर तयार केलेल्या तीन चाकी सायकलीवरून ती शहरात फिरते. महाविद्यालयातही जाते.यामुळे तिच्यावर कौतुकमिश्रीत थाप पडते. मृणाल ही धामणगाव येथील लक्ष्मीनारायण अग्रवाल पॉलिटेक्निक महाविद्यालयात मॅकेनिकल अभियंता या शिक्षणक्रमाच्या पहिल्या वर्षाला शिकते. केवळ पुस्तकी ज्ञान मिळवून पढतमुर्ख होण्याची मृणालची इच्छा नाही. किंवा पिढ्यान् पिढ्या नशिबी आलेल्या कमकुवत आर्थिक स्थितीमध्ये खितपत पडण्याचीही तिची तयारी नाही. परिस्थिती पालटण्यासाठी स्वत: कष्ट आणि जिद्दीने पुढे जाण्याचा तिचा संकल्प आहे. तिने तिच्या कर्तृत्वातून हे सिध्द देखील केले आहे. अशी आहे सोलर सायकलबारा व्हॉल्टच्या दोन सोलर प्लेट, हब मोटर, यावर ही तीन चाकी सोलर उर्जेची सायकल तयार केली़ आॅटोप्रमाणे हॉर्न, लाईट, चालू-बंद करण्याचे बटण आहे. तसेच ही सायकल अधीक वेगाने नेण्यासाठी गेअर बसविण्यात आले आहे़तचारही बहिणी भावी अभियंता मृणालला तिन्ही बहिणी असून मोठी पूजा ही इलेक्ट्रॉनीक विभागाला याच महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला शिकत आहे़ तर रसिका ही संगणक विभागात शेवटच्या वर्षाला आहे़ तर वैष्णवी ही दुसऱ्या वर्षाच्या इलेक्ट्रॉनीक विभागाला आहे़ चारही बहिणींनी विपरित आर्थिक स्थितीचा सामना करूनही यश संपादन करण्याचे ध्येय नजरेसमोर ठेवले आहे.