गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेद्वारा घनकचरा नियमांचे वारंवार उल्लंघन होत असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळही डोळेझाक करीत आहे. याविरोधात पर्यावरण प्रेमींनी राष्ट्रीय हरित लवादा (एनजीटी) मध्ये ७ आॅगस्टला प्रकरण दाखल केले आहे. यामध्ये जिल्हाधिकारी, महापालिकेसह प्रदूषण मंडळालाही प्रतिवादी बनविण्यात आल्याने महापालिकेच्या अडचणी वाढणार आहे.याविषयी पर्यावरणप्रेमी गणेश अनासने यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांकडे वारंवार तक्रारी दाखल केल्या असताना केवळ नोटीस बजावण्याव्यतिरिक्त काहीही केलेले नाही. त्यामुळे आता राष्ट्रीय हरित लवादाकडे घाव घेण्यात आली आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावणार, असे सांगत महापालिकेद्वारा मिहान एअरपोर्ट अॅथॉरिटीकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेतले. मात्र, या कचºयावर अद्याप प्रक्रिया झालेली नाही. विशेष म्हणजे विमानतळापासून कचराडेपो हा २० किमीपेक्षा कमी अंतरावर नसावा, असा नियम असताना शहर व विमानतळ याच्यापासून २० किमी अंतरावर आहे, या नियमांचेदेखील उल्लंघन होत असल्याचे हरित लवादाच्या निदर्शनात आणून दिले.महापालिकेला कचराडेपोत प्रक्रिया करण्यासाठी अधिकृत मुदत ३१ जानेवारी २०१७ पर्यंत होती. अद्याप याचे नूतनीकरण झालेले नाही. यासाठी महापालिकेने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवानगी घेतली नसल्याने कचरा डेपोत जमा होणार कचरा नियमबाह्य असल्याचे अनासने म्हणाले. शहरात ओला, सुका कचरा व घातक कचरा वेगवेगळा केल्या जात नाही.सांडपाण्याने पेढी नदी प्रदूषितशहरातील घातक वैद्यकीय कचºयाबाबतची नोटीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने १७ जून २०१९ रोजी बजावली आहे. महापालिकेद्वारा सांडपाण्यावर कुठलीच प्रक्रिया न करता पेढी नदीत टाकण्यात येत असल्याने नदी प्रदूषित झालेली आहे. यासोबतच सांडपाणी व मैलावर प्रक्रिया होत नाही व हा प्रकार सध्याही सुरू असल्याबाबतची कागदपत्रे हरित लवादाकडे सादर केलेली आहे.एनजीटीचे कुठलेही पत्र प्राप्त नाही. एसडब्ल्यूएम-२०१६ अन्वये कार्यवाही प्रक्रियेत आहे. बायोमायनिंग, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट निविदा प्रक्रियेत आहे.- संजय निपाणे, आयुक्त, महापालिका
घनकचरा : ‘एनजीटी'त खटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 1:11 AM
महापालिकेद्वारा घनकचरा नियमांचे वारंवार उल्लंघन होत असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळही डोळेझाक करीत आहे. याविरोधात पर्यावरण प्रेमींनी राष्ट्रीय हरित लवादा (एनजीटी) मध्ये ७ आॅगस्टला प्रकरण दाखल केले आहे.
ठळक मुद्देमुद्दा प्रदूषणाचा। जिल्हाधिकारी, महापालिका अन् महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळही प्रतिवादी