अचलपूर : येथील कचरा डेपोत जागाच शिल्लक राहिलेली नसल्याने दररोज शेकडो मेट्रिक टन कचरा डेपोच्या कंपाउंड बाहेर रस्त्यावर टाकला जात आहे. नगरपरिषदेजवळ पर्यायी जागा नसल्याने घनकचऱ्याचे डोंगर येथे उभे झाले आहे. परतवाडा शहरातील घनकचरा डेपो चार वर्षांपासून बंद असल्याने रायपुरा डेपोत कचरा टाकण्यात येत आहे. अचलपूर परतवाडा येथील ४० वाॅर्डातील घनकचरा व घंटागाडीचा कचरा मृत जनावरे कचरा डेपोत टाकली जातात. त्यामुळे परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांना व शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे नगरपरिषद प्रशासन हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे.
परतवाडा येथील कचरा याच डेपोत टाकण्यात येतो. ट्रॅक्टर ट्रालीने कचरा येथे दररोज टाकण्यात येतो. घनकचरा डेपो ओव्हरफ्लो झाल्यामुळे कचरा डेपोचे कंपाउंडबाहेरच टाकण्यात येतो. यात मृत्यू जनावरांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. कचरा डेपोत कचरा जाळण्यासाठी आग लावली जाते. यामुळे आजूबाजूला धूर पसरतो. याबाबत प्रदूषण मंडळाकडे नागरिकांनी तक्रार केली. मात्र, नगर परिषद कर्मचाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. अचलपूर नगर परिषदेला कचरा डेपोची जागा वाढविणे आवश्यक आहे. कचऱ्याचे विलगीकरण करून वेगळे करणे, कचऱ्यापासून खताची निर्मितीची प्रक्रिया करणे आवश्यक आहे. त्यातून नगरपरिषदेला आर्थिक उत्पन्नसुद्धा मिळेल आणि कचऱ्याचा प्रश्न निकाली निघेल. घन कचऱ्याचे डोंगर कमी करून तेथे बगीचा निर्माण करण्याची आवश्यकता आहे. मात्र, नगर परिषद याबाबत हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरिकांचा प्रशासनाविरुद्ध तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. यासंदर्भात सीओ फातले यांच्या संपर्क केला असता, होऊ शकला नाही.
कोट
अचलपूर नगर परिषदेने घनकचरा व्यवस्थापनासाठी पर्यायी व्यवस्था करणे खूप आवश्यक झाले आहे. नवीन जागा विकत घेऊन तेथे कचरा डेपो निर्माण करावा.
- बंटी कक्करानिया, सभापती, आरोग्य विभाग, नगरपरिषद
नगरसेवक प्रहार- प्रफुल्ल महाजन, शेतकरी
याबाबत नगरपरिषदेला अनेक वेळा तक्रारी देऊनसुद्धा नगरपरिषद या मुख्य बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे. या घनकचऱ्याच्या दुर्गंधीमुळे शेतकऱ्यांना नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.
140921\img-20210812-wa0084.jpg
अचलपूर घनकचरा ओव्हरफ्लो