लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभा निवडणुकांचे वातावरण तापायला आता खऱ्या अर्थाने सुरूवात झालेली आहे. २९ मार्चला उमेदवारी अर्जाची माघार झाल्यानंतर त्याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. राष्ट्रीय पक्षांसाठी सात चिन्ह राखीव आहेत, तर अपक्षांना उपलब्ध १९९ निवडणूक चिन्हापैकी एक चिन्ह निवडावे लागेल. यामध्ये बांगडी, कानातले (ईअररिंग), बॉटल, टोपी, नेकलेससह अन्य चिन्हांचा पर्याय उपलब्ध आहे.अमरावती लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्जाची २६ मार्च ही डेडलाईन आहे. २९ मार्चला दुपारी तीन वाजेपर्यत उमेदवारी अर्जाची माघार घेता येणार आहे व याच दिवशी उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात येईल. यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, सीपीआय, सीपीएम व बहुजन समाज पार्टी हे राष्ट्रीय पक्ष असल्याने यांचे निवडणूक चिन्ह राखीव आहेत. तर शिवसेना व भारीप बहुजन महासंघ हे प्रादेशिक पक्ष असल्याने त्यांनाही त्यांच्या पक्षाचे चिन्ह मिळते. याव्यतिरिक्त अपक्षांसाठी १९९ निवडणूक चिन्ह हे राखीव आहेत. यामध्ये ३६ चिन्ह हे नव्याने समाविष्ट झाल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील यांनी दिली.आयोगाचे २० जून २०१८ चे अधिसुचनेप्रमाणे एअर कंडीशनर, कपाट, आॅटो रिक्षा, बेबी वॉकर, बलून, फळांची टोपली, बॅट, बॅट्समन, बॅटरी टॉर्च, मन्यांचा नेकलेस, बेल्ट, बेंच, सायकलमध्ये हवा भरण्याचा पंप, दुर्बिण, बिस्कीट, ब्लॅक बोर्ड, जहाज, बॉटल, बॉक्स, ब्रेड, विट, ब्रिफकेस, ब्रश, बकेट, कॅन, कारपेट, कॅरम बोर्ड, चेन, चक्की, चपाती रोलर, चेस बोर्ड, कोट, नारळाची बाग, कलर ट्रे आणि ब्रश आदी चिन्हाचा समावेश आहे.नव्या चिन्हात सीसीटीव्ही अन् कॉम्प्युटरआयोगाने नव्याने ३६ चिन्हाचा यामध्ये समावेश केला आहे. यामध्ये सफरचंद, हेलिकॉप्टर, शिट्टी वाजविणारा माणूस, ब्रेड टोस्टर, सीसीटीव्ही, कॉम्प्युटर, कॉम्प्युटर माऊस, डोअर बेल, कानातले, फुटबॉल, अद्रक, पर्स, कार्ट, ग्लॉस, कॅटली, शिंक, फुटबॉल प्लेयर, लॅपटॉप, लुडो, पेनड्राइव्ह, रिमोट, रबरस्टॅम्प, जहाज, सितार, शटर, सोफा, स्पॅनर, स्टंप, स्विचबोर्ड, चिमटा, ट्युबलाईट या चिन्हांचा यामध्ये समावेश आहे.फुलकोबी, हिरवी मिरची अन् शेंगदानेहीबांगड्या, मन्यांचा नेकलेस, शिसी, ब्रेड, फुलकोबी, चप्पल, चिमणी, पेट्रोल पंप, डिझेल पंप, डिश अॅटेना, डोली, फ्राक, द्राक्ष, हिरवी मिरची, हेडफोन, हॉकी आणि बॉल, आईसक्रिम, शेंगदाने, मोती, मटार, फोन चार्जर, रेझर, सेफ्टी पिन यासह अनेक मजेदार चिन्ह यावेळी अपक्ष उमेदवारांसाठी असणार आहे.
कुणाला कानातले, कुणाला बांगडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 10:31 PM
लोकसभा निवडणुकांचे वातावरण तापायला आता खऱ्या अर्थाने सुरूवात झालेली आहे. २९ मार्चला उमेदवारी अर्जाची माघार झाल्यानंतर त्याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. राष्ट्रीय पक्षांसाठी सात चिन्ह राखीव आहेत, तर अपक्षांना उपलब्ध १९९ निवडणूक चिन्हापैकी एक चिन्ह निवडावे लागेल. यामध्ये बांगडी, कानातले (ईअररिंग), बॉटल, टोपी, नेकलेससह अन्य चिन्हांचा पर्याय उपलब्ध आहे.
ठळक मुद्देचॉकलेट, अंगठी, भेंडी अन् हिरव्या मिरचीसह १९९ चिन्ह उपलब्धरंजक चिन्हांचे वाटप