शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

सोनवणेला न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2020 6:00 AM

निलंबित करण्यात आल्यानंतर आता अटकेत असलेला दत्तापूर-धामणगावचा तत्कालीन ठाणेदार रवींद्र सोनवणे याला मंगळवारी उशिरा रात्री अमरावती येथून ताब्यात घेतले. मध्यरात्री चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात त्याला नेण्यात आले. त्याने तेथे रात्र काढली. कोठडीत रात्र काढताना सोनवणे ढसाढसा रडत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देकोठडीत ढसाढसा रडला आरोपी ठाणेदार

सोनवणेला न्यायालयीन कोठडी 

सेवासमाप्तीची कारवाई सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दत्तापूर येथील अल्पवयीन मुलीच्या हत्याप्रकरणात निलंबित व अटक केलेला ठाणेदार रवींद्र सोनवणे याला बुधवारी अमरावतीच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस.ए. सिन्हा यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने सोनवणे याला १७ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलिसांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली आहे. सोनवणेला न्यायालयात आणताना, नेताना पोलिसांनी प्रसिद्धी माध्यमांना दूर ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.वाहन उपलब्ध होईपर्यंत सोनवणेला कौटुंबिक न्यायालयात लपवून ठेवण्यात आले होते.राज्यघटनेच्या कलम ३११ नुसार चौकशीत दोषसिद्धी होऊन गुन्हा दाखल झाल्यामुळे सोनवणे याच्याशासकीय सेवेच्या समाप्तीसाठीच्या हालचाली पोलीस अधिकाऱ्यांनी सुरू केल्या आहेत.कोठडीत ढसाढसा रडला आरोपी ठाणेदारअल्पवयीन मुलीचे हत्याप्रकरण : पालकांनी व्यक्त केले समाधानमोहन राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : निलंबित करण्यात आल्यानंतर आता अटकेत असलेला दत्तापूर-धामणगावचा तत्कालीन ठाणेदार रवींद्र सोनवणे याला मंगळवारी उशिरा रात्री अमरावती येथून ताब्यात घेतले. मध्यरात्री चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात त्याला नेण्यात आले. त्याने तेथे रात्र काढली. कोठडीत रात्र काढताना सोनवणे ढसाढसा रडत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.संरक्षण करण्याऐवजी तीन महिने सलगी साधून सतत अत्याचार करणारा दत्तापूर ठाण्याचा निलंबित पोलीस निरीक्षक रवींद्र सोनवणेच्या त्याच्याच खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुसक्या आवळल्या. शवविच्छेदन अहवालानंतर आढळलेल्या अनेक गंभीर बाबी व मोबाईल सीडीआर (कॉल डिटेल्स रेकॉर्ड) वरून अल्पवयीन मुलीच्या मातापित्यांनी केलेल्या आरोपांना पुष्टी मिळाली. मुलीच्या हत्येला सोनवणेच जबाबदार असल्याचा स्पष्ट आरोप मुलीच्या पालकांचा आहे. पालकांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन ठाणेदारालाच अटक केल्यामुळे पालकांनी जिल्हा पोलीस प्रशसनावर विश्वास व्यक्त केला. तालुक्यात सोनवणेच्या अटकेचीच सर्वत्र चर्चा आहे.विश्वास बळावलाउपविभागीय अधिकारी कविता फरतडे यांनी पारदर्शक तपास केला. जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी आणि आयजी मकरंद रानडे यांनी तटस्थ भूमिका घेतली. ठाणेदार रवींद्र सोनवणे याला आरोपी केले. या कारवाईने पोलीस प्रशासनावर सर्वसामान्यांचा विश्वास बळावला असल्याचे मत मुलीच्या जन्मदात्यांनी व्यक्त केले. पूर्वी ज्या ठाणेदारावर मुलीच्या संरक्षणाची जबाबदारी होती, त्याच ठाणेदाराने मुलीशी गैरकृत्य केले. त्याच खात्यातील इतर अधिकारी साथ देतील का, अशी शंका पालकांना होती. सोनवणेच्या अटकेने ती धुवून निघाली.

टॅग्स :Policeपोलिसjailतुरुंग