अमरावती : मोठ्या भावासोबत खेळत असताना अपार्टमेंटमधील विहिरीत साडेचार वर्षाचा मुलगा अचानक पडला. ही माहिती धावत जावून मोठ्या मुलाने वडिलांना दिली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता विहिरीत उडी घेवून मुलाचा जीव वाचविला. त्यानंतर महापालिकेच्या रेस्क्यु टिमच्या मदतीने मुलाला व वडिलांनी सुखरुप १५ मिनिटाच्या रेसक्यु ऑपरेशननंतर विहिरीबाहेर काढण्यात यश आले. ही हद्यद्रावक घटना शेगाव नाका नजीकच्या अभिनव कॉलनीतील साईतिर्थ अपार्टमेंटमध्ये शनिवारी सांयकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.
मनिष सोपानराव मानकर (३८, रा. अभिनव कॉलनी) असे या शुर वडिलांचे नाव आहे तर त्यांचा मुलगा मनस्व (साडेचार वर्ष) असे जीवदान मिळालेल्या मुलाचे नाव आहे. मनस्व विहीरीत पडल्याची माहिती त्याचा मोठा भाऊ आर्यनने वडिलांना दिली. त्यानंतर वडिलांनी क्षणाचाही विलंब न लावता ६० ते ७० फुट खोल विहीरीत उडी घेतली. आधी त्यांना मनस्व दिसून आला नाही. मात्र त्यांनी आरडाओरड करीत खोल पाण्यात पुन्हा डूपकी घेतल्याने मनस्वचा पाय त्यांच्या हातात लागला. त्यानंतर विहीरीत असलेल्या कपराचा आधार घेत मनस्वला मिठीत घेतले. तो पर्यंत विहीरीजवळ अपार्टमेंट मधील नागरिकांनी गर्दी केली होती. वडिल व मुलगा जीवंत आहे किवा नाही? हे कुणालाही कळत नव्हते. याची माहिती तातडीने भ्रमध्वनीवरून माोरे नामक व्यक्तीने महापालिकेच्या अग्नीशमन विभागाच्या रेस्क्यु टिमला दिली. त्यांनीही दोन किंमीचे अंतर पाच मिनिटात गाठून विहीरीत दोरीची सीडी सोडून प्रथम एक जणांना विहीरीत उतरुन प्रथम मुलाल व नंतर वडिलांनी सुरुरुप विहीरी बाहेर काढले. मुलाला आईजवळ दिल्यानंतर तिचा जीव भांड्यात पडला. यावेळी आईचे डोळे पणावले होते. मुलाला जवळच्या फॅमीली डॉक्टरकडे उपचाराकरीता नेण्यात आले होते.
दोघांना वाचविणार्या रेस्क्यु टिममध्ये अभिषेक निंभोरकर, सुरज लोणारे, अमोल सांळूखे, हर्षद दहातोंडे, जयकुमार वानखडे, शुभम जाधव यांचा समावेश होता.