शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
2
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
3
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
4
न्यायाधीश अन् कोर्ट सगळंच खोटं; गुजरातमधील १०० एकर सरकारी जमीन बळकावली
5
सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर; पण तरीही तुरुंगातच राहणार, कारण...
6
मोठा निष्काळजीपणा! ड्रायव्हर झाला डॉक्टर; इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांना दिली औषधं, इंजेक्शन
7
Google कर्मचाऱ्यांना मोफत भोजन का पुरवते? सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलं नेमकं कारण
8
"महाविकास आघाडी फुटणार"; शिवसेना नेत्याचा मोठा दावा, म्हणाले, " २४ तासांत उद्धव ठाकरे..."
9
जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!
10
यमुना एक्सप्रेस वेवरून जात होती कार, पोलिसांना आला संशय, तपाणसी केली असता सापडला सोन्याचा खजिना
11
प्रियंका चोप्राने अन्नू कपूर यांना किस करण्यास दिलेला नकार; म्हणाले, "माझ्याकडे चांगला चेहरा नाही..."
12
"देवेंद्र फडणवीसांनी फार हुशारीने..."; पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप, मोदींनाही सवाल
13
"ही चूक हरयाणात झालीये, महाराष्ट्रातही होतेय", पृथ्वीराज चव्हाणांनी ठेवलं मुद्द्यावर बोट
14
"दिल्लीत गुन्हेगारी वाढतेय, लोकांच्या मनात भीती असते की..."; आप नेत्याचा भाजपावर निशाणा
15
"बंटेंगे तो कटेंगे", मुंबईत योगींचे फोटो असलेले बॅनर्स; काय म्हणाले मुख्तार अब्बास नकवी?
16
चीनच्या जीडीपी एवढे झाले गोल्डचे मार्केट कॅप, 5 वर्षात व्हॅल्यू डबल; चेक करा देशातील सोन्या-चांदीचा लेटेस्ट दर
17
डॅशिंग IAS अधिकारी! वयाच्या ५७व्या वर्षी प्रेमविवाह; आता मंदिरांवरील लाऊडस्पीकरवर 'सवाल'
18
धर्मासाठी सिनेइंडस्ट्रीला केला रामराम, ३ हिट सिनेमात केलं होतं काम, सध्या काय करतेय २४ वर्षीय अभिनेत्री?
19
भाजपातील गटबाजीला कंटाळले, राष्ट्रवादीत गेले, तिथेही दिला राजीनामा; आता ठाकरेंकडे चालले
20
अजित पवार गट विधानसभेच्या किती जागा लढवणार? अजितदादा म्हणाले... 

सोफियाची पाईपलाईन फुटल्याने शेतात शिरले पाणी

By admin | Published: September 12, 2015 12:12 AM

तालुक्यातील पार्डी शिवारात सोफिया वीज प्रकल्पासाठी नेण्यात आलेली पाईपलाइन फुटल्यामुळे येथील सात शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले आहे.

मोर्शी : तालुक्यातील पार्डी शिवारात सोफिया वीज प्रकल्पासाठी नेण्यात आलेली पाईपलाइन फुटल्यामुळे येथील सात शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. याविषयी सुचविले असता कंपनी शेतकऱ्यांना थारा देत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हा कचेरीवर धडक देऊन नुकसान भरपाईच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना आ. डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.पार्डी येथील शेतकरी प्रल्हाद निंभोरकर, नरेश इंगोले, पुंडलिकराव इंगोले, श्रीकृष्ण दाढे, राजेश्वर दाढे, मारोतराव दाढे, बापुराव कळमकर यांच्या शेताजवळून सोफिया वीज प्रकल्पाची पाईपलाइन गेली आहे. ही पाईपलाइन मागील एक वर्षापासून लिकेज आहे. या पाईपलाईनचे पाणी सदर शेतकऱ्यांच्या शेतात शिरत होते. परंतु लिकेजमध्ये वाढ झाल्याने यावर्षी तब्बल सात शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही शेतातून ही पाईपलाइन तीन मीटर आतून गेली आहे. शेतात सर्वत्र पाणी साचल्यामुळे पीक पूर्णत: सडले असून जमिनीचा पोत खराब झाला आहे. याबाबत कंपनीला २५ आॅगस्ट रोजी पुराव्यासह लेखी निवेदन देऊन तक्रार केली होती. त्यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली व मदतीचे आश्वासन दिले. परंतु अद्याप मदत मिळाली नाही. मागील वर्षीची नुकसान भरपाई नाही व पाईपलाइनची दुरूस्ती नसून नुकसान वाढले आहे. शेतीवर उदरनिर्वाह अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन नुकसान भरपाईची मागणी केली आहे. निवेदन देतेवेळी संजय घुलक्षे, विनोद खरपकर, नरेश इंगोले, पुंडलिक इंगोले, शेख लतिफ, लक्ष्मण दाढे, मारोतराव दाढे, अब्दुल जावेद, बापूराव कळमकर, स्वप्निल निंभोरकर, मोरेश्वर दाढे, गजानन दाढे, पंजाबराव बोरकर आदी शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)