शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

...अन् आईने फोडला हंबरडा; खेळताना पाळण्याच्या दोरीचा फास लागल्याने लेकीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 8:25 PM

Accidental Death : दर्यापुरातील घटना, बिजवे कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

ठळक मुद्दे मुग्धा आशिष बिजवे (११) असे मृत मुलीचे नाव आहे.मुग्धा ही पाचव्या वर्गात शिकणारी अत्यंत हुशार व परिसरात सर्वांची लाडकी होती.

दर्यापूर (अमरावती) - घरातील पाळण्याच्या दोरीचा फास लागून ११ वर्षीय मुलीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना येथील आठवडी बाजार परिसरात बुधवारी रात्री १० च्या सुमारास घडली. मुग्धा आशिष बिजवे (११) असे मृत मुलीचे नाव आहे.येथील आठवडी बाजारातील रहिवासी व किराणा व्यावसायी आशिष बिजवे यांची मुलगी मुग्धा ही बुधवारी रात्री घराच्या वरच्या माळ्यावर अभ्यासासाठी गेली होती. तेथील पाळण्यावर बसून झोका घेताना अचानक तिच्या गळ्याला पाळण्याची दोरी आवळली गेली. फास लागल्याने तिचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. बराच वेळ होऊनही मुलगी खाली आली नसल्याने मुग्धाच्या आजीने वर जाऊन बघितल्यावर ही घटना उघडकीस आली. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजारच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली.             

कुटुंबीयांनी तात्काळ तिला रुग्णालयात नेले. मात्र, तोवर तिचा मृत्यू झाला होता. मुग्धा ही पाचव्या वर्गात शिकणारी अत्यंत हुशार व परिसरात सर्वांची लाडकी होती. घटनेदरम्यान मुग्धाची आई आणि लहान बहीण बाहेरगावी गेले होते. मुग्धाला आवडणारी भाजी आणण्यासाठी तिचे वडील हॉटेलमध्ये गेले होते. परत आल्यानंतर त्यांना मोठा मानसिक धक्का बसला. सदर घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

अन् आईने फोडला हंबरडाही घटना कळताच मुग्धाची आई वैशाली बिजवे यांनी तातडीने घर गाठले. गतप्राण झालेली लाडकी मुलगी बघून त्यांनी हंबरडा फोडला. गुरुवारी सकाळी अंत्यविधी होत असताना माझ्या मुलीला कोठे घेऊन जात आहात, अशी विचारणा त्या करीत होत्या. मुग्धाची लहान बहीण अक्षतासुद्धा दीदीला काय झाले, म्हणत रडत होती. उपस्थितांनादेखील अश्रू आवरता आले नाही.

टॅग्स :Deathमृत्यूAmravatiअमरावतीPoliceपोलिस