अमरावती - पॅरेटरल अँड इंटरनल न्यट्रीशन सोसायटी आॅफ आशियाचेवतीने दक्षिण कोरीयाची राजधानी सेउल येथे १३ ते १६ जून दरम्यान पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय संमेलनात स्थानिक डॉ.भूषण वामनराव खोले यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. ‘युज आॅफ द इनोवेटिव्ह सॉफ्टवेअर इन क्रिटिकल केअर न्युट्रीशन डिसीजन मेकींग अॅड रिसर्च’ या विषयावर शोधप्रबंधसुद्धा त्यांनी या संमेलनात सादर केला. या संमेलनात जगातून ३० देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. विवीध देशांच्या प्रतिनीधींनी शोधप्रबंध सादर केले. डॉ. भूषण खोले हे मुंबईच्या रहेजा फोर्टीस असोसिएटस रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात सेवा देत आहे. त्यांना विभागप्रमुख डॉ. संजीव शशिभूषण यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. भूषण खोले आपल्या यशाचे श्रेय आई सुनंदा खोले, वडील वामन खोले, पत्नी डॉ.शुभांगी खोले, हर्षाली खोले, प्रदीप अकर्ते, पंकज कडू, सुमित्रा अकर्ते, श्रद्धा अंदूरे, श्वेता कडू, महेश अंदूरे, भरत खोलेसह आदींना देतात. यांच्या आंतरराष्ट्रीय संमेलनात सहभागी झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
दक्षिण कोरीयातील आंतरराष्ट्रीय संमेलनात वरूडच्या भूषण खोलेंनी केले भारताचे प्रतिनिधित्व
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 5:37 PM