शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

पेरणी ८० टक्के, कर्जवाटप मात्र २१ टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 10:42 PM

यंदा खरिपाची पेरणी या आठवड्यात शेवटाला जाणार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ८० टक्के पेरणी आटोपली असताना पीक कर्जवाटप मात्र २१ टक्क््यांवर अडकले आहे. बँकांचे सहकार्य नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.

ठळक मुद्देबोंडअळी, तूर, हरभऱ्याचे अनुदानही नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदा खरिपाची पेरणी या आठवड्यात शेवटाला जाणार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ८० टक्के पेरणी आटोपली असताना पीक कर्जवाटप मात्र २१ टक्क््यांवर अडकले आहे. बँकांचे सहकार्य नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.यंदाच्या खरिपात रोहिणी, मृग नक्षत्र कोरडेच गेल्याने शेतकºयांना आर्द्राची कास धरावी लागली. पेरणीस उशीर होत असल्याने बँकांकडून दिलासा मिळेल, या आशेवर शेतकरी होते. अखेर त्यांना उसनवार करावी लागली. बँकांचा मात्र हंगामाचे सुरुवातीपासून नन्नाचा पाढा आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनी बँकांच्या नाड्या आवळल्या. जिल्हाधिकाºयांनी त्यांच्या कार्यालयातील एसबीआयची पाच खाती बंद केली. याचा कोणताही असर बँकांच्या कर्जवाटपावर झालेला नाही. यंदाच्या हंगामात राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्जवाटपाचा टक्का वाढलाच नाही. जिल्हा बँकेने जून महिन्यात कर्जवाटप सुरू केले. आता मात्र त्यांच्याही कर्जवाटपाची गती मंदावली आहे. जिल्हाधिकारी आठवड्याला बँकांची आढावा बैठक घेत असतानाही कर्जवाटपाचा वेग वाढला नाही. एवढेच नव्हे तर जिल्हा बँकेवरदेखील सहकार विभागाचा अंकुश नसल्याचा आरोप होत आहे.गतवर्षी बोंडअळीच्या संकटाने धास्तावलेल्या शेतकºयांनी यंदा सोयाबीनला प्राधान्य दिले. महाबीजवर विश्वास दर्शविला. मात्र, यंदा महाबीज सोयाबीन बियाण्याची उगवणशक्ती कमी असल्याने काही भागांतील शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.वरूड, धामणगाव, चांदूररेल्वेत सर्वाधिक पेरणीयंदाच्या खरिपामध्ये जिल्ह्यात ७.२८ लाख हेक्टर सरासरी लागवडक्षेत्र असताना सद्यस्थितीत सहा लाख हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. यामध्ये वरूड, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे तालुक्यांमध्ये ८५ टक्के क्षेत्रात पेरणी आटोपली. दर्यापूर, अचलपूर, अंजनगाव सुर्जी तालुक्यात ६५ ते ७० टक्के पेरणी झालेली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत २१३ मिमी पाऊस झाला. ही टक्केवारी ११७ आहे. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने सरासरी ओलांडल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.अशी आहे कर्जवाटपाची सद्यस्थितीअलाहाबाद बँकेने २.८५ कोटी, आंध्रा बँक ७५ लाख, बँक आॅफ बडोदा १.७६ कोटी, बीओआय ६.७९ कोटी, बँक आॅफ महाराष्ट्र ३६.४०, कॅनरा बँक २.०५ कोटी, सेंट्रल बॅक ४० कोटी, आयसीआयसीआय ४.६७ कोटी, देणा ५.६३ कोटी, आयडीबीआय १.३७ कोटी, इंडियन बँक ४.५७ कोटी, पंजाब नॅशनल ४.११ कोटी, एसबीआय ५९.८० कोटी, युनियन बँक ४५.१६ कोटी, अ‍ॅक्सिस बँक २.३८ कोटी, एचडीएफसी ११.७२ कोटी, विदर्भ कोकण २.३० कोटी व जिल्हा बँकेने १०७.९५ कोटींचे कर्जवाटप केले आहे.जिल्ह्याची ५० पैशांच्या आत पैसेवारी असल्याने २०१७-१८ मधील पीक कर्जाचे पुनर्गठण करण्यात येत आहे. त्यामुळे पीक कर्जाची गती निश्चितच वाढणार आहे. याशिवाय नियमितपणे कर्ज मेळावे आदी उपक्रम गावागावांत राबविण्यात येत आहेत.- संदीप जाधव, जिल्हा उपनिबंधक