शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
4
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
6
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
7
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
8
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
9
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
10
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
11
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
12
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
14
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
15
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
16
राज्यभर हुडहुडी, थंडीचा कडाका जाणवणार; पुणे, नाशिक, महाबळेश्वरला थंडी वाढली
17
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
18
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
19
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
20
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...

खरिपाची ९५ टक्के क्षेत्रात पेरणी

By admin | Published: August 22, 2015 12:39 AM

जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी ७ लाख १४ हजार ९५० क्षेत्राचे कृषी विभागाचे नियोजन असताना १९ आॅगस्टअखेर ६ लाख ७७ हजार ४४६ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे.

अमरावती : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी ७ लाख १४ हजार ९५० क्षेत्राचे कृषी विभागाचे नियोजन असताना १९ आॅगस्टअखेर ६ लाख ७७ हजार ४४६ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. हे क्षेत्र एकूण सरासरी क्षेत्राच्या ९४.७५ टक्के आहे. अपेक्षित क्षेत्रापेक्षा अधिक ११० टक्के पेरणी नांदगाव तालुक्यात झाली. सर्वात कमी ७२ टक्के क्षेत्रात पेरणी अचलपूर तालुक्यात झाली आहे. यंदाचा खरीप पेरणी हंगामाचा कालावधी जवळजवळ संपत आला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पेरणीक्षेत्र असणाऱ्या सोयाबीन व कापूस पिकांचा पेरणी कालावधी संपला आहे. अशा स्थितीत धारणी तालुक्यात ४५ हजार ९४० हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. चिखलदरा तालुक्यात २३ हजार ४३० हेक्टर, अमरावती तालुक्यात ५३ हजार १६५ हेक्टर, भातकुली तालुक्यात ४८ हजार ६४५ हेक्टर, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ६४ हजार १८७ हेक्टर, चांदूररेल्वे तालुक्यात ३९ हजार ५८९ हेक्टर, तिवसा तालुक्यात ४२ हजार ४९६ हेक्टर, मोर्शी तालुक्यात ५७ हजार ८७३ हेक्टर, वरूड तालुक्यात ४६ हजार ९११ हेक्टर, दर्यापूर तालुक्यात ६७ हजार ४३२ हेक्टर, अंजनगाव तालुक्यात ४२ हजार ४२० हेक्टर, अचलपूर तालुक्यात ४१ हजार ६९२ हेक्टर, चांदूरबाजार तालुक्यात ५१ हजार ५७४ हेक्टर व धामणगाव रेल्वे तालुक्यात ५२ हजार ९२ हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. चिखलदरा तालुक्यात अपेक्षित सरासरी क्षेत्राच्या १०३ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. चांदूरबाजार तालुक्यात ८८ टक्के, अचलपूर ७२ टक्के, अंजनगाव ९५ टक्के, दर्यापूर १०८ टक्के, वरूड ९८ टक्के, मोर्शी ९५ टक्के, तिवसा ९७ टक्के, चांदूररेल्वे ९१ टक्के, नांदगाव खंडेश्वर ११० टक्के, भातकुली ९९ टक्के, अमरावती ९८ टक्के, चिखलदरा ७७ टक्के व धारणी तालुक्यात ८८ टक्के क्षेत्रात पेरणी झालेली आहे. जिल्ह्यात कपाशीचे सर्वाधिक ३० हजार ९५० हेक्टर क्षेत्र वरूड तालुक्यात आहे. शेतीमशागतीला वेग आला आहे.