शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

मनाईहुकूम झुगारून खासदारांची मेळघाटात ‘पेरणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 11:03 PM

खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी दिवसभर मेळघाटातील २० पेक्षा अधिक गावांचा दौरा केला. व्याघ्र प्रकल्पाच्या संबंधित आदिवासींच्या सर्व अडचणी ऐकून जागेवरच सोडविण्याचा प्रयत्न केला. यात सेमाडोह येथे गुरांच्या चराईचा प्रश्न तात्काळ निकाली काढण्याचे आदेश उपस्थित वनाधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्दे२० गावांचा दौरा : आदिवासींच्या समस्या ‘आॅन दी स्पॉट’ सोडविल्या

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी दिवसभर मेळघाटातील २० पेक्षा अधिक गावांचा दौरा केला. व्याघ्र प्रकल्पाच्या संबंधित आदिवासींच्या सर्व अडचणी ऐकून जागेवरच सोडविण्याचा प्रयत्न केला. यात सेमाडोह येथे गुरांच्या चराईचा प्रश्न तात्काळ निकाली काढण्याचे आदेश उपस्थित वनाधिकाऱ्यांना दिले. तेथीलच व्याघ्र प्रकल्पाने मनाई केलेल्या जमिनीवर पेरणी केली. मनाईहुकूम झुगारून खासदारांनी पेरणी केल्याने आदिवासी शेतकऱ्यांना बळ मिळाले. कावडाझिरी येथील वाघाच्या हल्ल्यात जखमी मुलीला सव्वा लाख रुपयांचा धनादेश दिला.खासदार नवनीत राणा सोमवारी वन, व्याघ्र प्रकल्पांसह महसूल आणि संबंधित विभागाच्या अधिकाºयांना घेऊन धारणी व चिखलदरा तालुक्यातील विविध गावांत पोहोचल्या. वन आणि अन्य प्रकल्पासंदर्भात आदिवासींनी त्यांच्या समस्या राणा यांच्यासमोर मांडल्या. मांडल्या. आदिवासींसाठी अडचण ठरणाऱ्या समस्या निकाली काढण्यासाठी दिल्ली येथे वरिष्ठ अधिकाºयांची बैठकीत आवाज उचलण्याची ग्वाही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. आदिवासी गावांचे पुनर्वसन करण्यात आले. दहा लाख रुपये घ्या आणि कुठेही जा, या कायद्यातून आदिवासींचे जीवनमान कसे उंचावणार, असा सवाल त्यांनी केला. सेमाडोह येथील आदिवासींना तब्बल सात किलोमीटर दूर अंतरावर चराईसाठी जंगल देण्यात आले. इतक्या दूर अंतरावर चराई शक्य नाही, असे बजावत त्यांना लगतच चराईची सुविधा देण्याचे निेर्देश नवनीत राणा यांनी दिले.धनादेश वाटपगत आठवड्यात वाघिणीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या संगीता राधेश्याम दावर या आठ वर्षीय चिमुकलीला सव्वा लक्ष रुपयांचा धनादेश देण्यात आला. तेलंगणा येथील एका कंपनीत विद्युत धक्कयाने मरण पावलेल्या अचलपूर तालुक्यातील काळविट गावातील दिनेश संतू चाकोने (१९) यांच्या परिवाराला दोन लाख रुपये मदत रोख स्वरुपात दिली.राणा आणि वाघिणीचे सात किलोमीटर अंतरब्रह्मपुरी येथून डोलार जंगलात सोडण्यात आलेल्या वाघिणीची दहशत परिसरात आहे. नवनीत राणा यांनी दौरा केला. तेव्हा ई-वन वाघीण केवळ सात किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती होती. त्यामुळे वनाधिकाऱ्यांची चांगली धावपळ झाली. सदर वाघिणीला ट्रॅप करण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाने प्रयत्न सुरू केल्याचे सांगण्यात आले.व्याघ्र आणि वन विभागासंदर्भात आदिवासींच्या समस्या निकाली काढण्यात येणार आहेत. काहींवर तोडगा काढण्यात आला. वाघिणीला ट्रॅप करण्यासाठी पाच दिवसापासून संबंधित विभाग कार्यरत आहे. दिल्ली येथे एक बैठक लावून उर्वरित समस्या निकाली काढण्यात येईल.- नवनीत राणाखासदार, अमरावती