अमरावती : जिल्ह्यात रबीच्या पेरण्या अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. सद्यस्थितीत १ लाख ११ हजार ९३६ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. ही टक्केवारी ७७.१० आहे. यामध्ये सर्वाधिक ९३ हजार हेक्टरमध्ये हरभरा व १७ हजार हेक्टरमध्ये गव्हाची पेरणी झालेली आहे.
कृषी विभागाद्वारे रबीसाठी यंदा सरासरी १ लाख ४५ हजार १८१ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. त्यानुसार सद्यस्थितीत रबी ज्वारीसाठी दर्यापूर तालुक्यात ०.८ हेक्टर, गहू १६,४१७, मका ५४२, हरभरा ९२,५६१ हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. याशिवाय करडई, सूर्यफूल, मोहरी आदी पिकांचे क्षेत्र निरंक आहे. हरभरा क्षेत्रात काही भागात ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे.
कृषी विभागाच्या अहवालानुसार, सद्यस्थितीत हरभऱ्यासाठी धारणी तालुक्यात ८,५१३ हेक्टर, चिखलदरा १,६८०, अमरावती ५,४०१, भातकुली ८,१९९, नांदगाव खंडेश्वर ५,९५९, चांदूर रेल्वे ३,१७२, तिवसा ५,७६४, मोर्शी ६,२६४, वरूड २,९७५, दर्यापूर २०,१३१, अंजनगाव सुर्जी ५,५५०, अचलपूर ४,२७९, चांदूर बाजार ७,४७७ व धामणगाव रेल्वे तालुक्यात ७,१९७ हेक्टरवर पेरणी झालेली आहे
बॉक्स
असे आहे गव्हाचे क्षेत्र
गव्हाची १६,४१७ हेक्टरमध्ये पेरणी
गव्हासाठी धारणी तालुक्यात ४,१०१ हेक्टर, चिखलदरा १,५६०, अमरावती १,०२२, भातकुली ७१, नांदगाव खंडेश्वर २,७०१, चांदूर रेल्वे ६०२, तिवसा ६९१, मोर्शी १,२२०, वरूड १,३१२, दयार्पूर ९७, अंजनगाव सुर्जी १२९, अचलपूर १,०८२, चांदूर बाजार ६४४ व धामणगाव रेल्वे तालुक्यात १,१८१ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे.