लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : क्षेत्रीय स्तरावरून पेरणीची अचूक माहिती येणे, या प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढविणे व डेटा संकलीत करतांना पारदर्शकता येणे यासाठी आता मोबाईल अॅपचा वापर शेतकरी करणार आहे. सहा विभागातील सहा तालुक्यांमध्ये हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. अमरावती विभागात अचलपूर तालुक्याची या प्रकल्पासाठी निवड झाल्याने १८५ गावातील ५४ हजार ६३८ शेतकरी खातेदार या अद्ययावत प्रणालीचा वापर करणार आहे.पीक अहवाल प्रक्रियेत शेतकºयांचा सहभाग वाढल्यास कृषी पतपुरवठा करणे सुलभ होणार आहे. पीक विमा अणि पीक कापणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य होणार आहे. यासाठी शेतकºयांनी पीक पेरणीची माहिती मोबाइल अॅपद्वारा नाव नमुना नंबर १२ मध्ये नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी टाटा ट्रस्ट द्वारा एक आज्ञावली (फार्मर फे्रंडली अॅप) विकसित केलेले आहे. या पद्धतीचा पहिला अवलंब पालघर जिल्ह्यातील करंजपाडा या गावात करण्यात आला. प्रायोगीक तत्वावरील या प्रकल्पाला उत्सुक शेतकºयांनी या आज्ञावलीची स्थापना करून पीक अहवालाची ही नवी पद्धत उत्साहाने स्वीकारली.शेतकऱ्यांजवळ मोबाईल नसल्यास ‘नो प्राब्लेम’शेतकºयांना त्यांच्या मोबाईल किंवा याकामी वापरात येणारा कोणताही स्मार्ट फोन नंबरची तलाठ्याकडे आगाऊ नोंद करावी लागणार आहे. शेतकऱ्याकडे स्मार्ट फोन नसल्यास साध्या मोबाईलद्वारे आपल्या शेतातील पिकांचा तपशील ‘एसएमएस’द्वारे प्रणालीमध्ये अपलोड करावा लागणार आहे. जर शेतकऱ्याकडे मोबाईलच नाही किंवा तशी व्यवस्था करू शकत नाही, त्यांनी तलाठ्याकडे उपलब्ध असलेल्या स्मार्ट फोन किंवा टॅबलेटचा वापर करून आपल्या पिकाचा तपशील अपलोड करावा लागणार आहे.अशी होणार प्रकल्पाची अंलबजावणीशेतकºयांच्या मोबाईलमध्ये टाटा ट्रस्टच्या टीमद्वारे अॅपची स्थापना करण्यात येईल. पेरणीनंतर १५ ते २० दिवसांदरम्यान शेतातील उगवण पीकनिहाय छायाचित्रासह पहिली नोंद प्रणालीमध्ये अपलोड करावी. त्यानंतर हंगाम संपेपर्यंत प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतातील उभ्या पिकांची नोंद अॅपमध्ये करावी लागणार आहे. नैसर्र्गिक आपत्ती या सदरात अतिवृष्टी, पूर गारपीट, वादळ, दुष्काळ आदी नुकसानाची माहिती प्रणालीमध्ये हा डेटा अपलोड करावी लागणार आहे. त्यानंतर शेतकºयांच्या मोबाईल नंबरसह हा डाटा स्वयंमुद्रित करण्यात येऊन विश्लेषणासाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांच्या मोबाईल अॅपद्वारे पेरणीची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 1:21 AM
क्षेत्रीय स्तरावरून पेरणीची अचूक माहिती येणे, या प्रक्रियेत शेतकºयांचा सहभाग वाढविणे व डेटा संकलीत करतांना पारदर्शकता येणे यासाठी आता मोबाईल अॅपचा वापर शेतकरी करणार आहे. सहा विभागातील सहा तालुक्यांमध्ये हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
ठळक मुद्देजिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट : अचलपूर तालुक्यात १८५ गावांतील ५४,६३८ खातेदारांना लाभ