शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

सहा लाख हेक्टरांतील पेरण्या खोळंबल्या

By admin | Published: July 01, 2017 12:05 AM

यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात सात लाख २८ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यापैकी ९७ हजार ३५५ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली.

पावसाने पळविले तोंडचे पाणी : ३० हजार हेक्टरमध्ये दुबार पेरणीची शक्यतालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात सात लाख २८ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यापैकी ९७ हजार ३५५ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली. मात्र, जिल्ह्यात मान्सूनचा दमदार पाऊस नसल्यामुळे किमान ३० ते ४० हजार हेक्टरमधील पेरण्यांना मोड येण्याची चिन्हे आहेत. दोन दिवसांत पाऊस न आल्यास ५० ते ६० टक्के क्षेत्रात दुबार पेरणीचे सावट आहे.यंदाही पावसाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. रोहिणी पाठोपाठ मृगनक्षत्रदेखील कोरडे गेले. आर्द्रावर शेतकऱ्यांची मदार असताना आठ दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही. मागील आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या. पावसाने हुलकावणी दिली. हवामान खात्याने मान्सून सक्रिय होणार असल्याचे सांगितले असले तरी जोवर १०० मिमी पाऊस होत नाही, तोवर पेरण्या करू नयेत, असा कृषी विभागाचा सल्ला आहे.सद्यस्थितीत जिल्ह्यात ९७ हजार ३५५ हेक्टरमध्ये पेरण्या आटोपल्या. ही १३.४ टक्केवारी आहे. यामध्ये अंजनगाव सुर्जी तालुक्यात ४९० हेक्टर, अचलपूर तालुक्यात दोन हजार १९२ हेक्टर, चांदूरबाजार तालुक्यात ७,७५५ हेक्टर, धामणगाव रेल्वे तालुक्यात १४ हजार ८३४ हेक्टर, चांदूररेल्वे तालुक्यात ३३७ हेक्टर, तिवसा तालुक्यात ११ हजार ३७२ हेक्टर, मोर्शी तालुक्यात १९ हजार ९२ हेक्टर, वरूड तालुक्यात तीन हजार ५८८ हेक्टर,व दर्यापूर तालुक्यात दोन हजार ६८३ हेक्टरमध्ये पेरणी आटोपली.जिल्ह्यात जून महिन्यात किमान १४६ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र ९६.५ मिमी पाऊस पडला. प्रत्यक्ष पडलेल्या पावसाची ६६.१ टक्केवारी आहे तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत हा ११.८ टक्केच पाऊस आहे. २४ तासांत जिल्ह्यात ५.६ मिमी पाऊस पडला. यामध्ये सर्वाधिक २९.९ मिमी तिवसा तालुक्यात व १२.९ मिमी नांदगाव तालुक्यात पडला.अशी झाली पिकनिहाय पेरणीजिल्ह्यात सद्यस्थितीत ९७ हजार ३५५ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. यामध्ये सोयाबीन ३१ हजार ७४७ हेक्टर, कापूस ३७ हजार २३३ हेक्टर, तूर १५ हजार ९० हेक्टर, धान ३ हजार ९१९ हेक्टर, ज्वार ४ हजार ४३५ हेक्टर, मका २ हजार ४७० हेक्टर, मूग १ हजार ५६७ हेक्टर, उडिद ५७० हेक्टर, भुईमूग ७४ हेक्टर व तिळाची ३७ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे.मूग, उडदाचे क्षेत्र होणार बादपाऊस बेपत्ता असल्यामुळे खरिपातील अल्पावधीच्या म्हणजेच ६० दिवसांचा कालावधी असणारे मूग व उडदाचे पीक बाद होण्याची शक्यता आहे. ही दोन्ही पिके सोयाबीनच्या क्षेत्रात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. पावसाची दडी अधिक असल्यास ही पिके कपाशीच्या क्षेत्रात रूपांतरित होण्याची शक्यता अधिक आहे. विदर्भात तूर्तास सार्वत्रिक पाऊस नाहीअमरावती : अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात मान्सूनच्या उत्तम वाटचालीसाठी हवामानशास्त्रावर आधारित परिस्थिती योग्य आहे. परंतु अरबी समुद्रामधून ढगांचा प्रवाह कमी प्रमाणात होत असल्यामुळे पश्चिम विदर्भात अद्यापही मान्सूनची स्थिती कमकुवत असल्याचे मत हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांच्या मते, सौराष्ट्रावर कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्राकार वारे ४.५ किमी.उंचीवर आहेत. येथून मध्य-पश्चिम बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे. हा कमी दाबाचा पट्टा उत्तर मध्यप्रदेश व उत्तर छत्तीसगड, उत्तर ओडिसाकडे ओढला जात असल्याने पावसाळी मेघ मोठ्या प्रमाणात उत्तरेकडे खेचले जात आहेत. उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे वाहात असून त्याच्या प्रभावामुळे पूर्व विदर्भात बरा पाऊस पडत आहे. पश्चिम विदर्भात विखुरलेला पाऊस पडत आहे.