लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील खरिपाचा हंगामच धोक्यात आल्याने शेतकरी संकटात आहेत. शेतकऱ्यांना सरसकट एकरी ३० हजारांची मदत देण्यासह अन्य मागण्यांकडे शासनाचा लक्ष वेधण्यासाठी आ. रवि राणा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सोयाबीन पेटविले व पावसाअभावी जागीच वाळलेली झाडे जिल्ह्याधिकाऱ्यांच्या पुढ्यात ठेवली.यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने अल्प कालावधीच्या सोयाबीन, मूग व उडीद पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच किडींचाही प्रादुर्भाव झाला. अपुऱ्या पावसामुळे कपाशी व तूर या पिकांची वाढ खुंटली. बाधित पिकांचे तातडीने सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना एकरी ३० हजारांची मदत द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाºयांमार्फत केंद्र व राज्य शासनाला करण्यात आली. भविष्यात उद्भवणाºया पाणीटंचाई निवारणाबाबत नियोजन करावे तसेच इंधन भाववाढ कमी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी राजू रोडगे, संजय हिंगासपुरे, मयूरी कावरे, दिनट टेकाम, रश्मी घुले, जया तेलखडे, मीनल डकरे, प्रदीप थोरात, सुमती ढोके, अभिजित देश्मुख, ज्योती सैरासे, अनुल अग्रवाल, महानंदा पवार, गिरीश कासट, प्रवीण पवार, लता रायबोले, रेखा पवार, अय्याज पठाण, सुनील निचत, जगदीश अंबाडकर आदी उपस्थित होते.
कलेक्ट्रेटच्या आवारात राणांनी पेटविले सोयाबीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 10:35 PM