लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : तालुक्यात १८, १९, २० ऑक्टोबरला पडलेल्या परतीच्या पावसाने जिथे कपाशी पिकाला ओलावा मिळाला, तिथेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी पळविले. दिवाळी अंधारात जाण्याची चिन्हे दिसत आहे.मोर्शी तालुक्यात सोयाबीन पिकाखाली ११९०० हेक्टर क्षेत्र आहे. बहुतांश पिकांची सवंगणी सुरू आहे. काही प्रमाणात पीक उभे आहे. तीन दिवस आलेला पाऊस सोयाबीन पिकाचे नुकसान करणारा ठरला. अनेक शेतकऱ्यांनी कापणी करून ठेवलेली सोयाबीनची गंजी शेतात पडून आहे. काही ठिकाणी गंजीतही पाणी शिरले. तीन दिवसांत पाऊस मोठ्या प्रमाणावर पडला नसला तरी फारशे सूर्यदर्शन नसल्यामुळे गंजी सुकली नाही. उभे पीक उन्ह पडल्यानंतर जागीच फुटण्यास सुरुवात होते. त्यामुळे उभ्या सोयाबीनलाही धोका आहे. काही शेतकºयांनी विमा उतरविला असला तरी त्यांच्याकडे इत्थंभूत माहिती नाही. टोल फ्री क्रमांक, तक्रार कुणाकडे करायची, याबाबत सर्व शेतकरी अनभिज्ञ आहेत.कपाशीच्या आधी नगदी पीक म्हणून शेतकºयांच्या हाती सोयाबीन पिकातून पैसा येतो. चार दिवसांवर आलेली दिवाळी सोयाबीन काढणीची लगबग वाढविते. फार कमी शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून विक्री केली. बहुतांश पीक शेतात आहे. अवकाळी पावसाने शेतकºयांचा खर्च व चिंता वाढविली आहे. पीक उभे करण्यासाठी कर्ज काढले; आता दिवाळी साजरी करण्यासाठी तीच वेळ त्यांच्यावर आली आहे. मागील तीन-चार वर्षांपासून शेतकऱ्यांचे उत्पन्न घटल्यामुळे बाजारपेठेवर मंदीचे सावट आलेच. धनत्रयोदशीला सुरू होणारी दिवाळी शेतकºयांच्या पदरात काही नसल्यामुळे तालुक्याच्या बाजारपेठेतही यंदा सामसूम राहण्याची चिन्हे आहेत. शासनाने सर्वेक्षण करून नुकसानभरपाई तसेच विमा परतावा द्यावा, अशी मागणी होत आहे.
सोयाबीन उत्पादकांची दिवाळी अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 9:08 PM
मोर्शी तालुक्यात सोयाबीन पिकाखाली ११९०० हेक्टर क्षेत्र आहे. बहुतांश पिकांची सवंगणी सुरू आहे. काही प्रमाणात पीक उभे आहे. तीन दिवस आलेला पाऊस सोयाबीन पिकाचे नुकसान करणारा ठरला. अनेक शेतकऱ्यांनी कापणी करून ठेवलेली सोयाबीनची गंजी शेतात पडून आहे. काही ठिकाणी गंजीतही पाणी शिरले. तीन दिवसांत पाऊस मोठ्या प्रमाणावर पडला नसला तरी फारशे सूर्यदर्शन नसल्यामुळे गंजी सुकली नाही. उभे पीक उन्ह पडल्यानंतर जागीच फुटण्यास सुरुवात होते. त्यामुळे उभ्या सोयाबीनलाही धोका आहे.
ठळक मुद्देशिवारात दाणादाण : सोंगणी केलेल्या पिकाच्या गंजीखाली पाणी