राजुरा बाजार : यावर्षी खरीप हंगामात मान्सून परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे काढणीच्या अवस्थेत नुकसान झाले. यामुळे पुढील खरीप हंगामात या पिकासाठी बियाण्यांची टंचाई भासण्याची शक्यता असल्याने घरचेच सोयाबीन राखून ठेवा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.पुढील खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन लागवड करायची आहे, त्यांनी आपल्या गावात किंवा परिसरातील ज्या शेतकऱ्यांनी सोयाबिन राखून ठेवले आहे, त्यांच्याकडून आताच सोयाबिन खरेदी करून ठेवावे म्हणजे उत्पादन खर्चात बचत होईल व पुढील हंगामात बियाणे न मिळाल्यामुळे होणारा मनस्तापदेखील टाळता येईल. त्यामुळे अशा शेतकऱ्यांची स्वत:ची व गावातील शेतकऱ्यांची गरज भागविता येऊ शकते. पुढील खरीप हंगामात सोयाबिन बियाण्यांची टंचाई भासण्याची शक्यता आहे. परिणामी खुल्या बाजारातील सोयाबीन बियाणे हे महागडे होऊ शकते.
त्यामुळे हा उपाय कृषी विभागाने सुचविला आहे.
-------------गत खरीप हंगामात पावसाळा लांबल्याने सोयाबीन बियाण्याची प्रतवारी घसरली. शेतक०यांकडे चांगले सोयाबीन असल्यास, बाजारात न विकता उगवण क्षमता तपासून राखून ठेवल्यास बियाणे म्हणून वापरता येईल.
-संतोष सातदिवे, तालुका कृषी अधिकारी, वरूड