सूरज दाहाट/ तिवसा : शासनाने बोगस बियाणे शेतकऱ्यांना मिळू नये, याकरिता विविध मोहीम राबविली. जिल्ह्यात ठिकठिकाणी बोगस व निकृष्ट बियाण्यांवर कारवाईदेखील केली. मात्र, महाडीबीटीमार्फत मिळालेले बियाणे बोगस व निकृष्ट असल्याचा आरोप तिवसा येथील युवा शेतकऱ्याने केला आहे. त्यांच्या शेतात सोयाबीनचे झाड वाढले मात्र, शंगाच धरल्या नसल्याची तक्रार त्यांनी कृषी विभागाकडे केली आहे.
तिवसा येथील युवा शेतकरी स्वप्निल देशमुख यांनी महाडीबीटीवरून माऊस १६२ सोयाबीन वाण खरेदी केले. स्वप्निलने २ एक्कर शेतात सोयाबीनची लागवड केली. सोयाबीनचे पीकदेखील बहरले. फुलावर असताना सोयाबीनला शेंगाच धरल्या नाहीत. सोयाबीनची वाढ ५ फुटापर्यंत झाली. मात्र, शेंगाच धरल्या नाही, याबाबतची तक्रार तिवसा तालुका कृषी अधिकारी यांचेकडे करण्यात आली. सध्या स्वप्निलच्या शेतात सोयाबीन बहरले असले तरी त्याला शेंगा नसल्याने तो आर्थिक संकटात सापडला आहे. त्याला मदतीची गरज आहे. मात्र, प्रशासन यावर कोणते पाऊल उचलते याकडे लक्ष लागले आहे.